India Pakistan War Drone Attack Video: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव वाढला असून, सीमाभागात भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूनही या कारवाईचा निषेध करत प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. मात्र भारताच्या संरक्षण दलाच्या अभेद्य कवचापुढं पाकचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. पाकिस्ताननं एकामागून एक कैक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करुनही भारतानं या प्रत्येक प्रयत्नाचा समूळ नायनाट केला.
8 आणि 9 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघनही केलं. यावेळी हे सर्व ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य उत्तर देण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यदलानं एक नहा व्हिडीओ जारी करत स्पष्ट केलं. भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यास वचनबद्ध आहे असं म्हणत सैन्यदलानं पाकिस्तानच्या सर्व नापाक योजनांना सडेतोड उत्तर दिलं जाईल अशी हमीसुद्धा दिली. अवघ्या 14 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ड्रोन, अचूक लक्ष्यभेद आणि त्यानंतर होणारा स्फोट अशी दृश्य या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानवरील ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी करत पाकचे ड्रोन पाडल्याचा पुरावा संपूर्ण देशापुढे सादर करण्यात आला आहे. दरम्यान हे झालं एक उदाहरण. मात्र भारतानं पाकिस्तानी ड्रोन हल्ल्याचे असे अनेक कट उधळून लावले. फक्त जम्मू काश्मीर सीमाभागातच नव्हे, तर कच्छ सीमेवरही भारतानं पाकचे 3 ड्रोन पाडले. सर क्रीक परिसरातही ड्रोन दिसले, ज्यानंतर देशाच्या पश्चिम सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला.
OPERATION SINDOOR
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) May 9, 2025
Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and… pic.twitter.com/9YcW2hSwi5
तिथं पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष जमवण्यासाठी संपूर्ण जम्मू भागामध्ये व्यापक शोधमोहिम हाती घेण्यात आली असून, यंत्रणा सावध असल्याचं पाहायला मिलत आहे. यातच इतका मोठा पटका बसलेला असतानाही काहीही शिकवण न मिळालेला पाकिस्तान कुरापती करतच असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 9 मे 2025 रोजी उधमपूरमध्ये, पाकिस्तानी ड्रोनने नॉर्दर्न कमांडच्या लष्करी सुविधा आणि जनरल एरियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व ड्रोन यशस्वीरित्या रोखण्यात आले आणि पाडण्यात आले.