Marathi News> भारत
Advertisement

₹1 Crore Per Kg.. सोन्यापेक्षाही दुप्पट महागडा धातू; भारत-पाक युद्धामुळे वाढलं महत्त्व; देशात फक्त 4..

Metal Costlier Than Gold And Silver: भारत-पाकिस्तानदरम्यानच्या तणावपूर्ण वातावरणामध्ये सोन्याचे दर चर्चेत असतानाच सोन्यापेक्षाही महागडा धातूही सध्या चर्चेत आहे.

₹1 Crore Per Kg.. सोन्यापेक्षाही दुप्पट महागडा धातू; भारत-पाक युद्धामुळे वाढलं महत्त्व; देशात फक्त 4..

Costlier Metal Than Gold: भारत-पाकिस्तान युद्ध आणि जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या दरांमध्ये बराच बदल होत असल्याचं दिसत आहे. मात्र असं असतानाच सोन्यापेक्षाही एका धातू सध्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे हा धातू पिवळ्या धातूपेक्षा म्हणजेच सोन्यापेक्षा अनेक पटींनी महाग आहे. या धातूमध्ये असं खास काय आहे आणि त्याची किंमत नेमकी किती आहे ते पाहूयात...

कोणता आहे हा धातू आणि काय आहे वैशिष्ट्यं?

आपण ज्या धातूबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे यूरेनियम! या धातूबद्दल आपल्यापैकी अनेकांनी शालेय जीवनामध्ये विज्ञान विषयातील अभ्यासात ऐकलं आहे. या धातूचा सिम्बॉल इंग्रजीमधील यू (U) हे अक्षर असून पिरिऑडिकल टेबलमध्ये त्याचा निर्देशांक 92 आहे. या धातूचा वापर अण्विक ऊर्जा तयार करण्यासाठी आणि अण्वस्रं तयार करण्यासाठी वापरला जातो. यूरेनियम हा चंदेरी आणि राखाडी रंगाचा धातू असतो. यूरेनियमचं वैशिष्ट्य म्हणजे हा धातू काळानुरुप हळूहळू नाहीसा होतो. अण्वस्रांबरोबरच वीजनिर्मिती, आरोग्यविषयक क्षेत्रात आणि आयसोटोप्स म्हणून यूरेनियमचा वापर होतो. यूरेनियम हा मानवासाठी धोकादायक असतो आणि पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. मात्र हा नियमित सर्वासामान्यांच्या वापरातील धातू नसल्याने त्याच्या ताकदीचा अंदाज लोकांना नाही. याचसाठी आपण आज एक किलो यूरेनियममधून नेमकी किती ऊर्जा मिळते हे जाणून घेणार आहोत. 

भारतात चार राज्यांमध्येच साठे

भारतात केवळ आंध्र प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये यूरेनियमचे साठे आहेत. भारतात अण्वस्रांसाठी आवश्यक असलेल्या यूरेनियमचं उत्पादन घेतलं जातं. यूरेनियमचं उत्खनन करण्यासाठी सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना कामं दिली जातात. यूरेनियमचं दुसरं नाव येलोकेक असंही आहे.

एक किलो यूरेनियममधून किती ऊर्जा तयार होते?

यूरेनियम हा एक नैसर्गिक धातू असल्याचं अंतरराष्ट्रीय अण्विक संघटनेचं म्हणणं आहे. यूरेनियम साखर, माती, पाणी आणि अगदी मानवी शरीरामध्येही आढळून येतो. एक किलो यूरेनियम (यूरेनियम-235)  जवळपास 24,000,000 किलो व्हॅट ऊर्जा निर्माण करतो. 2.7 मिलियन म्हणजेच 27 लाख किलो कोसळा जाळल्यावर एवढी ऊर्जा मिळते.

...म्हणून या धातूची मागणी जास्त

एक किलो यूरेनियम-235 चं पूर्ण विघटन केल्यास 20 टेराजूल ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी 1500 टन कोसळा जाळावा लागेल एवढी असते. तेल आणि कोळश्याच्या तुलनेत यूरेनियम फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळेच अण्विक ऊर्जा आणि अण्वस्रांमध्ये यूरेनियमचा वापर होत असल्यानेच तो एवढा महाग असतो. यूरेनियमला मोठी मागणी आहे. काही देशांमध्ये यूरेनियमचे मोठे साठे आहेत. काही देशांमध्ये याचे नैसर्गिक साठेच नाहीत. यूरेनियम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, तो उत्खन्नामधून प्राप्त करणे ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने त्याचं उत्पादन घेण्याचा खर्च हा सामान्य कोणत्याही धातूपेक्षा अधिक असल्याने त्याची किंमत जास्त असते.

नेमकी किंमत कशी ठरते?

आजच्या दरानुसार म्हणजेच 12 मे 2025 नुसार भारतात एक किलो सोनं घेतलं तर त्यासाठी अनेक अहवालांनुसार, एक किलो यूरेनियमची किंमत जवळपास 1 कोटी रुपयांपर्यंत असते. अनेक घटकांवर यूरेनियमची अंतिम किंमत ठरवली जाते. यामध्ये यूरेनियमचा प्रकार, बाजारपेठे कोणती आहे? बाजारपेठेत मागणी आहे का? उत्पादनासाठी किती खर्च येतो? यावर यूरेनियमची अंतिम किंमत ठरते.

Read More