India Pakistan War : भारतानं दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. त्यामुळे पाकिस्ताननं आता इराणकडे मदतीची याचना केली आहे. पाकिस्ताननं इराणकडे 126 ड्रोनची मागणी केली आहे. पाहुयात सविस्तर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला असून दहशतवाद्यांची ठिकाणं भारतानं उद्ध्वस्त केली आहेत. तसंच भारतानं आज देखील पाक शहरांवर ड्रोनद्वारे हल्ले करत त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमला खाक केलं आहे. दरम्यान यानंतर पाकिस्ताननं आता इराणकडे हात पसरले आहेत. इराणकडे पाकिस्ताननं मदतीची याचना केली आहे. त्यामळे इराणकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
इराण मध्यस्थी करणार?
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराग भारताच्या दौ-यावर. अब्बास अराग हे भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्यासोबत चर्चा करतील. अब्बास अराग हे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंची देखील भेट घेणार आहेत. अब्बास अराग हे सोमवारी इस्लामाबादमध्ये होते. त्यानंतर ते आज भारतात असून भारत-पाकमधल्या तणावात मध्यस्थी करू शकतात.
पाकिस्तानची इतर देशांकडे मदत मागण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील पाकिस्ताननं अनेक देशांकडे मदतीची मागणी केली होती. भारतानं हल्ला करू नये यासाठी पाकिस्ताननं रशिया, अमेरिकेकडे मदतीची मागणी केली होती.
पाकिस्तानी खासदार ताहिर इकबाल धायमोकलून रडले
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतानं बदला घेतला आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून हल्ले करत दहशतवाद्यांचा खेळ खल्लास केला आहे. दरम्यान भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये रडारड सुरू झाली आहे. पाकिस्तानचे खासदार ताहिर इकबाल पाकिस्तानच्या संसदेत धायमोकलून रडले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भूमिका भारतानं घेतली आहे. दहशतवाद्यांच्या आकांना पाकिस्ताननं त्यांच्या देशात आश्रय दिला आहे. त्यामुळे भारतानं आज देखील पाकिस्तानवर हल्ला केला आहे. भीकेला लागलेल्या पाकिस्तान भारताला उत्तर देण्यासाठी सक्षम नसल्यामुळे त्यांनी आता शस्त्रांसाठी इराणकडे भीक मागायला सुरूवात केली आहे.