मुंबई : नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत पाकिस्तानच्या तीन लहान मुलांनी चुकून प्रवेश केला. ही तीनही पाकिस्तानी अल्पवयीन मुले पुछ येथील एका शाळेत पोहोचले. मात्र तिथे पोहोचल्यावर शाळेतील मुलांना शिकताना पाहून त्यांना रडू कोसळले. भावूक होऊन ते बोलले की, भारतीय सेनेकडून शिकण्यासारखं आहे. (India repatriates three children of Pakistan-occupied Kashmir who crossed the LoC in Poonch) भारतीय सेनेच्या जवानांनी आमच्यासोबत कुटुंबाप्रमाणे व्यवहार केला. आम्हाला असं वाटलं की, आम्ही भारतात नाही तर आमच्या घरीच आहोत.
बुधवारी पुछ जिल्ह्यात भारत - पाकिस्तान नियंत्रण रेषेतील गुलपुर सेक्टरमध्ये भारतीय क्षेत्रात या तीन अल्पवयीन मुलांना भारतीय सैन्याने पकडले. यानंतर त्यांची भारतीय सैन्य आणि इतर एजन्सीने देखील त्यांची चौकशी केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, ही तिन्ही मुलं चुकून भारतात आले. यानंतर सैन्याने या तीन्ही मुलांना नमाज पडण्यासाठी मशिदीत नेलं. एवढंच नव्हे तर त्यानंतर त्यांना शाळेत देखील नेण्यात आले. शाळेत शिकणाऱ्या मुलांना पाहून हे तिनही मुलं अतिशय भावूक झाले. काही काळ मुलांना एकटक पाहू देखील लागले.
India repatriates three children of Pakistan-occupied Kashmir who crossed the LoC in Poonch
— ANI Digital (@ani_digital) August 20, 2021
Read @ANI Story | https://t.co/whsgCCV2KF#IndianArmy #repatriate #children #LOC pic.twitter.com/EkgMLFy276
शुक्रवारी दुपारी केजी ब्रिगेडचे कमांडर राकेश नायर यांच्यासोबत तिन्ही मुलं चक्का दां बागमधील राह-ए-मिलनवर पोहोचले. जेथे मेजर अमित, नायब तहसीलदार मोहम्मद रशीदने पाकिस्तानी अधिकारी मेजर वाहिद आणि मेजर सज्जाद यांच्याकडे सुखरूप पोहोचवलं. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडे सुखरूप पोहोचण्याआधी त्या मुलांना काही भेटवस्तू दिल्या.
पुंछ जिल्ह्यातील चक्कां दा बाग क्षेत्रात पकडलेल्या मुलांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे. धनयाल मलिक (17) हा मोहम्मद नियाज अली यांचा मुलगा आहे. 13 वर्षीय अरबाज रहीम आणि 9 वर्षीय उमर रहीम हे दोघे अब्दुल रहीम यांची मुलं आहेत. तिन्ही मुलं हे जम्मू काश्मिरमध्ये राहणारे होते.