Marathi News> भारत
Advertisement

एप्रिल महिना महाभयानक! महाराष्ट्रासह भारतातील 'या' राज्यात जोरदार पाऊस आणि तुफान वादळ येणार? हवामान खात्याचा अलर्ट

एप्रिल महिना हा अत्यंत महाभयानक असू शकतो. महाराष्ट्रासह भारतातील काही राज्यात जोरदार पाऊस आणि तुफान वादळाचा तडाखा बसणार आहे.  हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 

एप्रिल महिना महाभयानक! महाराष्ट्रासह भारतातील 'या' राज्यात जोरदार पाऊस आणि तुफान वादळ येणार? हवामान खात्याचा अलर्ट

India Weather Forecast: हवामानात चित्र विचित्र बदल होत आहेत.  भारतीय हवामान विभागाने (IMD) भयानक अलर्ट दिला आहे. आयएमडीनुसार, पुढील काही दिवसांत देशाच्या अनेक भागात हवामानात मोठा बदल होणार. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण भारत, पश्चिम आणि मध्य भारतात हवामानात मोठा बदल होणार आहे. तर,  काही राज्यांमध्ये उष्णतेचा कहर पहायला मिळणार आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 2 आणि 3 एप्रिल रोजी केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात  ताशी 40 ते 60 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वारे वाहतील. 

मागील 24 तासांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये जोरदार वारे वाहत होते. तर, गंगीय पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट पहायला मिळाली.  की 1 ते 3 एप्रिल दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, माहे, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वायव्य भारतात उष्णता वाढेल

पुढील तीन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात 5 ते 7 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. बिहारमध्येही तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान आसाम आणि त्रिपुरामध्ये जोरदार वारे आणि वादळांचा धोका आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि किनारी आंध्र प्रदेशात उष्ण आणि दमट हवामान असेल.

वायव्य भारतात तापमान 7ते 7 अंशांनी वाढेल. बिहारमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 1 ते 3 एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पाऊस आणि वादळ अपेक्षित आहे. 2 आणि 3 एप्रिल रोजी केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्रिपुरामध्ये 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते. हवामान खात्याने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिथे पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे, तिथे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि वीज पडण्याच्या दुर्घटनेपासून बटाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Read More