Marathi News> भारत
Advertisement

गुजरातमध्ये वायूदलाचं विमान कोसळलं

 या दुर्घटनेत वैमानिक संजय चौहान यांचा मृत्यू झालाय 

गुजरातमध्ये वायूदलाचं विमान कोसळलं

अहमदाबाद : गुजरातच्या कच्छमध्ये मोठी दुर्घटना घडलीय. कच्छमध्ये वायुसेनेचं 'जग्वॉर' विमान कोसळलंय. या दुर्घटनेत वैमानिक संजय चौहान यांचा मृत्यू झालाय. संजय चौहान हे वायुसेनेत एअर कमांडर पदावर कार्यरत होते. विमानानं जामगगरहून उड्डाण घेतलं होतं.  

नेहमीप्रमाणेच जग्वॉर विमानानं ट्रेनिंग मिशन दरम्यान जामनगरहून सकाळी १०.३० वाजता उड्डाण घेतलं होतं. काही वेळातच हे विमान कोसळलं... 

ही दुर्घटना इतकी भीषण होती की अपघातस्थळी विमानाचे तुकडे काही किलोमीटर अंतरापर्यंत फेकले गेले. 

जग्वॉर विमान हे एक लढाऊ विमान आहे. शत्रूशी गोटात जाऊन काही किलोमीटर अंतरापर्यंत आत जाऊन हल्ला करण्याची या विमानाची क्षमता आहे. जग्वॉरच्या मदतीनं शत्रूच्या कॅम्प, एअरबेस आणि वॉरशिप्सला सहजरित्या निशाणा बनवलं जाऊ शकतं. 
 

Read More