Marathi News> भारत
Advertisement

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय एअरफोर्सची कमाल; पाकिस्तानी जेट्स भारतीय पायलट्सकडून खाक

Operation Sindoor : पाकिस्तानला खडे चारणा-या भारताचा एकही पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं भारतानं सांगितलं होतं. भारताच्या या दाव्याला आता पाकिस्ताननंही दुजोरा दिला असून एकही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं सांगितलंय.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय एअरफोर्सची कमाल; पाकिस्तानी जेट्स भारतीय पायलट्सकडून खाक

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय एअरफोर्सच्या जाँबाज पायलट्सनी कमाल केलीय. भारताच्या पायलट्नं पाकिस्तानची काही लढाऊ विमानं पाडल्याचं हवाईदलानं सांगितलंय. ही कारवाई करताना एकही भारतीय पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला नाही हे विशेष...

ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सशस्त्र सैन्यदलांचं मोठं यश मानलं गेलंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय एअरफोर्सनं जगं तोंडात बोटं घालेल अशी कारवाई केलीय. भारतीय हवाईदलाच्या फायटर जेट्नी पाकिस्तानच्या एफ-16 आणि जेएफ-17 विमानांचा खात्मा केल्याचं हवाई दलानं सांगितलंय. पाकिस्तानची अनेक लढाऊ विमानं भारताच्या जेट्सनी पाडली. पण ही विमानं पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याचंही हवाईदलानं सांगितलंय. पाडलेल्या विमानांची संख्या सांगून दावे-प्रतिदाव्यांचं युद्ध आपण छेडणार नाही असंही हवाई दलानं सांगितलंय.

भारतीय फायटर जेट राफेल पाडल्याचा दावा पाकिस्ताननं पहिल्या दिवसापासून केला जात होता. यावर भारतानं युद्धात नुकसान होत असतं पण भारतानं निर्धारीत लक्ष्यभेद केल्याचा दावाही त्यांनी केलाय.

पाकिस्तानला खडे चारणा-या भारताचा एकही पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं भारतानं सांगितलं होतं. भारताच्या या दाव्याला आता पाकिस्ताननंही दुजोरा दिला असून एकही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं सांगितलंय.

भारतीय हवाईदलाचे फायटर पायलेट्स हे शूरवीर आहेत हे याआधीही स्पष्ट झालंय. पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ-16 पाडलं होतं. यावेळीही भारतीय पायलट्सनं पराक्रमाची गाथा लिहिलीय. काही दिवसांत या कहाण्या जगासमोर येतील तेव्हा सगळं जग तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

Read More