Marathi News> भारत
Advertisement

Operation Sindoor 2.0 : भारतीय सैन्याने आतापर्यंत कोणकोणत्या देशांच्या शस्त्रांचा केलाय नायनाट

जगातील सर्वात शक्तिशाली देशाची शस्त्रे भारतीय सैन्याने नष्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चीनची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासोबतच भारताने अमेरिकेची अनेक शस्त्रेही नष्ट केली आहेत.

Operation Sindoor 2.0 : भारतीय सैन्याने आतापर्यंत कोणकोणत्या देशांच्या शस्त्रांचा केलाय नायनाट

India destroy Pakistan Air Defence System: 'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर, भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली देखील नष्ट केली आहे. भारत सरकारने म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतातील १५ शहरांमध्ये असलेल्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा मनसबुा भारतीय सैन्याने उधळून लावला आहे. हे हल्ले हाणून पाडण्यासोबतच, भारतीय सैन्याने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली HQ9 देखील नष्ट केली आहे. हे पाकिस्तानसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.  पाकिस्तानने लाखो डॉलर्स खर्च करून चीनकडून ही हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली होती.

भारतीय सैन्याने जगातील सर्वात शक्तिशाली देशाची शस्त्रे अशा प्रकारे नष्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चीनची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासोबतच भारताने अमेरिकेची अनेक शस्त्रेही नष्ट केली आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय सैन्याने आतापर्यंत कोणत्या देशांची शस्त्रे नष्ट केली आहेत ते जाणून घेऊया.

पाकिस्तानमध्ये चीनHQ-9 नष्ट

भारतीय सैन्याने चीनची हवाई संरक्षण प्रणाली HQ-9 नष्ट केली आहे. संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला लक्ष्य केले. पाकिस्तानने लाखो डॉलर्स खर्च करून चीनकडून ही हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली होती. पाकिस्तान आणि चीन दोघांनीही दावा केला की HQ-9 ही रशियाच्या S-300 सारखी एक मजबूत हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी हवेतच क्षेपणास्त्र रोखते आणि नष्ट करते. भारताने आता पाकिस्तानचे हवाई संरक्षण उध्वस्त केले आहे.

पॅटन टँक

१९६५ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात भारतीय सैन्याने अमेरिकन बनावटीचे पॅटन टँक देखील नष्ट केले होते. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानच्या पहिल्या सशस्त्र विभागाने सुमारे २०० टँकसह भारतावर हल्ला केला होता. या काळात शत्रूचे रणगाडे भारतीय सीमेत सुमारे १०-१२ किलोमीटर आत घुसले होते. भारतीय लष्कराचे जवान वीर अब्दुल हमीद यांनी त्यांच्या आरसीएल जीपने हे रणगाडे उडवून दिले, ज्यामुळे जग आश्चर्यचकित झाले.

पीएनएस गाझी

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानकडे त्या काळातील सर्वात प्रगत पाणबुडी पीएनएस गाझी होती. या पाणबुडीला रोखण्यासाठी भारतीय नौदलाने त्यांची सर्वात जुनी पाणबुडी आयएनएस राजपूत समुद्रात पाठवली. आयएनएस राजपूतने समुद्रात पाकिस्तानची पाणबुडी पीएनएस गाझी नष्ट केली होती, या हल्ल्यात ९३ पाकिस्तानी लष्करी अधिकारीही मारले गेले होते.

एफ-१६

भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात धोकादायक हवाई दलांपैकी एक आहे. भारतीय हवाई दलाने जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे अमेरिकेत बनवलेले F-16 लढाऊ विमान एकदा नाही तर दोनदा पाडले आहे. अमेरिकेचे हे लढाऊ विमान बरेच प्रगत मानले जाते. अमेरिकेने ही लढाऊ विमाने पाकिस्तानला दिली होती. १९७० मध्ये, भारतीय हवाई दलाने मिग-२१ सह एक एफ-१६ पाडले. यानंतर, विंग कमांडर अभिनंदन यांनी तिसऱ्या पिढीतील मिग-२१ सोबत चौथ्या पिढीतील एफ-१६ देखील नष्ट केले.

Read More