Marathi News> भारत
Advertisement

भारतीय सैन्याचा सीमेपार सर्जिकल स्ट्राईक? कमांडरसह 19 जण ठार झाल्याचा ULFA चा दावा, लेफ्टनंट रावत म्हणाले 'आम्ही...'

बंदी घातलेल्या उल्फा-आयने म्यानमारमधील त्यांच्या पूर्व मुख्यालयावर भारतीय लष्कराने पहाटे ड्रोनने हल्ला केल्याचा दावा केला आहे.   

भारतीय सैन्याचा सीमेपार सर्जिकल स्ट्राईक? कमांडरसह 19 जण ठार झाल्याचा ULFA चा दावा, लेफ्टनंट रावत म्हणाले 'आम्ही...'

भारतीय लष्कराने म्यानमारमधील बंदी घातलेल्या बंडखोर गट युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम-इंडिपेंडंट (ULFA-I) च्या पूर्वेकडील मुख्यालयावर ड्रोन हल्ले केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. उल्फा-आयने म्यानमारमधील त्यांच्या पूर्व मुख्यालयावर भारतीय लष्कराने पहाटे ड्रोनने हल्ला केल्याचा दावा केला होता. उल्फाने आपल्या प्रेस रिलीजमध्ये दावा केला आहे की, सीमेपार करण्यात आलेल्या हल्ल्यात 19 जण ठार झाले असून, 19 जण जखमी झाले आहेत. 

रिपोर्टनुसार, या हल्ल्यात उल्फाचा (आय) वरिष्ठ कमांडर नयन मेधी मारला गेला आहे. तसंच कॅम्पमध्ये उपस्थित असलेल्या मणिपूरच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) राजकीय शाखा असलेल्या रिव्होल्यूशनरी पीपल्स फ्रंट (आरपीएफ) सह मणिपुरी बंडखोर गटांचे काही कार्यकर्तेही मारले गेले आहेत. याशिवाय काहीजण जखमी झाले आहेत. 

मात्र भारतीय लष्कराने अधिकृत निवेदन जारी करत हा दावा फेटाळून लावला आहे. "अशा प्रकारच्या कारवाईबाबत भारतीय लष्कराकडे कोणतीही माहिती नाहीत" असं संरक्षण गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी आयएएनएसला सांगितलं आहे.

परेश बरुआच्या नेतृत्वाखालील उल्फा (आय) मध्ये आता फक्त एक वरिष्ठ अधिकारी अरुणोदय दोहोतिया उरला आहे, जो सध्या म्यानमारमध्ये आहे. म्यानमारच्या छावण्यांमधून काम करणारा उल्फा (आय) चा आणखी एक वरिष्ठ कमांडर रूपम असोम याला मे महिन्यात आसाम पोलिसांनी अटक केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसशी (ISI) संबंध असणारा बरुआ चीन-म्यानमार-भारताच्या (अरुणाचल प्रदेश) सीमावर्ती भागात वास्तव्य करत आहे.  तो त्याच्या बंडखोरी कारवायांच्या सर्वात खालच्या टप्प्यावर आहे. या घडामोडींची माहिती असलेल्या लोकांनी IANS ला सांगितलं की, ULFA (I) मुख्यालयावरील हे हल्ले या बंदी घातलेल्या संघटनांमधील अंतर्गत संघर्षामुळे झाले असावेत.

सध्या तात्मादॉच्या (सैन्य) अधिपत्याखाली असलेल्या म्यानमारमध्ये अनेक अतिरेकी संघटनांकडून हल्ले होत आहेत आणि भारत-म्यानमार सीमेचा वापर उल्फा (आय) सारख्या प्रतिबंधित संघटनांनी त्यांचे तळ उभारण्यासाठी अनेक वेळा केला आहे. सीमेजवळील लढाई भारतीय सुरक्षा व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे. मे 2025 मध्ये, मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जवळपास 10 अतिरेकी ठार झाले.

Read More