Marathi News> भारत
Advertisement

Operation Sindoor चे 5 विनाशकारी VIDEO; 9 दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक, पाकिस्तानच्या 7 पिढ्यांना लक्षात राहिल असा बदला

Operation Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात हल्ल्यात 120 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असं सांगण्यात येत आहे. या ऑपरेशन सिंदूरचे व्हिडीओ समोर आले आहेत.     

Operation Sindoor चे 5 विनाशकारी VIDEO; 9 दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक, पाकिस्तानच्या 7 पिढ्यांना लक्षात राहिल असा बदला

Operation Sindoor In Pakistan: गेल्या महिन्यात 22 एप्रिल 2025 ला जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करुन 27 पुरुषांची हत्या केली होती.  या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक झालेला भारताने आपला बदला पूर्ण केला. बुधवारी रात्री 7 मे 2025 ला मध्यरात्री भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची झोप उडवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये ऑपरेशन सिंदूर घडवलं. भारताने एकूण नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन 120 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता पाकिस्तानमधून ऑपरेशन सिंदूरचे विनाशकारी व्हिडीओ समोर आले आहेत. भारताने घेतलेल्या हा बदला पाकिस्तानमधील सात पिढ्यांना लक्षात राहिल असा आहे. भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य केलं. 

रात्री उशिरा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानच्या लोकांनी व्हिडीओ बनवले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा हल्ला केल्याची पुष्टी केली. बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद भागात हे हल्ले करण्यात आले. भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे की, लक्ष्य फक्त दहशतवादी तळ होते आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला नव्हता. हल्ले कुठे झाले ते व्हिडिओ पाहूया.

जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूर (पाकिस्तान) इथे आहे. जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर आहे. येथूनच दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यात आला. येथे झालेल्या हल्ल्यात 30 दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.

मुरीदके (पाकिस्तान) हे जम्मूच्या सांबा सेक्टरच्या अगदी समोर, सीमेपासून 30 किमी अंतरावर आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी, लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख तळ येथून जोडलेले होते. येथेही हल्ला झाला. गुलपूर (पीओके) हे पूंछ-राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपासून 35 किमी अंतरावर आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि 24 जून रोजी यात्रेकरूंवर झालेला हल्ला यांची मुळे येथेच होती. सवाई कॅम्प (पीओके) हे तंगधार सेक्टरच्या आत 30 किमी अंतरावर असलेले लष्कराचे तळ आहे.

Read More