Marathi News> भारत
Advertisement

रोल्स रॉयस शोरूममध्ये सेल्समनने केला अपमान, भारतीय उद्योजकाने 'असा' घेतला बदला!

कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची गोष्ट एवढी मनाला लागते की, त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ही घटना वाचून तुम्हालाही तुमच्या जीवनातील असाच एखादा प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही.   

रोल्स रॉयस शोरूममध्ये सेल्समनने केला अपमान, भारतीय उद्योजकाने 'असा' घेतला बदला!
'शब्द जपून वापरावे.. ';हे वाक्य आपण अनेकदा एकमेकांकडून ऐकतंच असतं. काहीही कुणाशीही बोलताना अतिशय सावधपणे बोलणे गरजेचे असते. पण ही गोष्ट सगळेच लक्ष ठेवतात असं नाही. पण त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर होणारा परिणाम अतिशय महत्त्वाचा असतो. 
 
मलयाली ज्वेलरी चेन जोयालुक्कास ग्रुपचे चेअरमन जॉय अलुक्कास यांच्यासोबत असाच एक प्रकार घडला आहे. जेव्हा ते युएईमध्ये रोल्स रॉयस कार पाहण्यासाठी एका शोरुममध्ये गेले होते. पण तेथील सेल्समॅनची गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली. तिथेच त्यांनी ती कार खरेदी केली आणि महत्त्वाचं म्हणजे ती कार स्वतः न वापरता कोटींची कार लक्की ड्रॉमध्ये गिफ्ट म्हणून दिली. 

भारतातील 50 व्या क्रमांकाचे श्रीमंत

ज्वेलरी ग्रुप जॉयलुक्कासचे चेअरमन जॉय अलुक्कास यांनी अलीकडेच त्यांची पहिली रोल्स रॉयस खरेदी केल्याची आठवण सांगितली. आलिशान कार घेण्यास प्रेरित झालेल्या घटनेचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला. महत्त्वाची बाब म्हणजे 67 वर्षीय अलुक्कास यांची सध्या 4.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. यासह ते भारतातील 50 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

24 वर्षांपूर्वी घडली होती

अल्लुकास यांनी दिलेल्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला. त्यादरम्यान त्याने सांगितले की, 2000 मध्ये तो काही कामानिमित्त UAE ला गेला होता. यावेळी त्यांनी रोल्स रॉयसच्या शोरूमलाही भेट दिली. शोरूममध्ये प्रवेश करताच एक सेल्समन आला आणि त्याला काय हवे आहे, असे विचारले. यावर अल्लुकास म्हणाले, "मी त्याला सांगितले की मला रोल्स रॉयस कार बघायची आहे." यानंतर तो त्यांच्याशी विचित्र वागू लागला. तो म्हणाला, "नाही, नाही, नाही. तुम्हाला कार घ्यायची असेल तर तुम्ही मित्सुबिशी शोरूममध्ये जा, तुम्हाला तेथे कार मिळेल." तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे हे बहुधा त्या सेल्समनला माहीत नसावे. त्यामुळे त्या सेल्समनने त्यांना साध्या कारच्या शोरुमचा पत्ता सांगितला. 

त्यानंतर काय झाले

अलुक्कास म्हणाले, "मला या प्रकरणाने अतिशय लाज वाटली आणि मी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मी ती खरेदी केली." रोल्स रॉयस खरेदी केल्यानंतर, त्यांना असे वाटले की, आपल्याला अल्ट्रा लक्झरी कारची गरज नाही आणि म्हणून त्यांनी तीच लक्झरी कार UAE मधील त्याच्या ज्वेलरी लाइनच्या वार्षिक रॅफल ड्रॉच्या विजेत्याला भेट देण्याचा निर्णय घेतला.

यावर्षी 6 कोटी रुपयांची कार खरेदी केली

आज जॉय अलुक्कासकडे आलिशान गाड्यांच कलेक्शन आहे. या वर्षी मार्चमध्ये त्यांनी आपली नवीन लक्झरी कार, रोल्स-रॉईस कलिनन खरेदी केली होती. या कारची किंमत 6 कोटी रुपये होती. रोल्स रॉयस व्यतिरिक्त त्याच्याकडे इतर लक्झरी कार देखील आहेत.

कोण आहेत जॉय अलुक्कास?

जॉय अलुकास आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे शाळा सोडल्याचं लेबल त्याला लागलं. मात्र याकडे लक्ष न देता ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात व्यस्त झाले. अलुक्कास 1987 मध्ये अबुधाबीमध्ये आपल्या कुटुंबाचे पहिले परदेशी स्टोअर उघडण्यासाठी पश्चिम आशियामध्ये गेले. नंतर, ते त्यांच्या वडिलांच्या ज्वेलरी कंपनीपासून वेगळा झाला आणि त्याने स्वत:चा Joyalukkas ब्रँड सुरू केला, ज्याची आता संपूर्ण भारतात 100 आणि परदेशात 60 दुकाने आहेत. सध्या त्यांच्या ग्रुपमध्ये 9,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. याचे मुख्यालय केरळमधील त्रिशूर येथे आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे या समूहाचे सोन्याच्या दागिन्यांचे जगातील सर्वात मोठे आउटलेट आहे.

संपत्तीमध्ये वाढ

फोर्ब्सच्या मते, गेल्या दशकभरात त्याच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $2.8 अब्ज होती जी आता $4.4 बिलियन झाली आहे. 2024 च्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत तो जगभरात 712 व्या क्रमांकावर आहे.
Read More