Marathi News> भारत
Advertisement

एका लग्नाची गोष्ट! रशियन गर्ल भारतीय तरूणासोबत अडकली लग्नबंधनात

देशात लग्नाचा माहोल सूरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाचे व्हिडिओ (Marriage Video Viral)व्हायरल होत आहेत. त्यात आता एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. 

एका लग्नाची गोष्ट! रशियन गर्ल भारतीय तरूणासोबत अडकली लग्नबंधनात

Russian Girl Wedding: देशात लग्नाचा माहोल सूरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाचे व्हिडिओ (Marriage Video Viral)व्हायरल होत आहेत. त्यात आता एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या लग्नात एका रशियन तरूणीने (Russian Girl) भारतीय तरूणासोबत (Indian Boy) लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाची संपुर्ण गावात चर्चा आहे. या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 

fallbacks

असे पडले प्रेमात

प्रतापगड जिल्ह्यात राहणारे सिंह कुटूंब व्यापारी कुटूंब आहे. या सिंह यांना दोन मुले आहेत. ज्यांची नाव मोहित सिंह आणि अनुज सिंह आहे. यातील मोठा मुलगा मोहितने इंटरचे शिक्षण घेतल्यानंतर अॅनिमेशनचा अभ्यास केला आणि हळूहळू कामाला सुरुवात केली. तर मोहित बंगळुरूमध्ये एका कंपनीत रुजू झाला. या कंपनीत त्याची भेट रशियात राहणाऱ्या वेरोनिकाशी झाली होती. कंपनीत एकत्र काम करत असल्याने त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रिचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा (Marriage)निर्णय घेतला होता.

fallbacks

मोहितने ठेवली अट

मोहित आणि वेरोनिका दोघेही एकमेंकांच्या प्रेमात होते. मात्र लग्नात कुटूंबियांचा अडसर येण्याची शक्यता देखील होती. त्यामुळे मोहितने वेरोनिकासमोर एक अट ठेवली होती. ही अट अशी होती की, जर त्याच्या आईने तिला पसंत केले, तरच तो तिच्याशी लग्न करणार होता. वेरोनिकानेही अट मान्य देखील केली. आणि पुढे जाऊन मोहितच्या आईने वेरोनिकाला पसंत करत लग्नाला होकार दिला.

हिंदू रितीरिवाजानूसार लग्न

दोन्ही कुटूंबियांकडून होकार आल्यानंतर वेरोनिका रशियातून आपल्या कुटूंबियांना भारतात घेऊन आली. त्यानंतर युपीच्या प्रतापगडमध्ये म्हणजेच मोहितच्या गावात 10 फेब्रुवारीला दोघांच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 12 फेब्रुवारीला  दोघे हिंदू रितीरिवाजानूसार (Hindu Rituals) लग्न बंधनात अडकले. या लग्नात वेरोनिकाच्या कुटुंबियांनी तुफान डान्स केला. 

fallbacks

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रताप गडमध्ये हा लग्न सोहळा पार पडला आहे. या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तसेच या लग्नाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. 

Read More