Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : लग्नात पोहोचला नववधुचा Ex, पुढे जे घडलं ते धक्कादायक ....

नववधुला भेटायला जेव्हा Ex Boyfriend स्टेजवर येतो....

VIDEO : लग्नात पोहोचला नववधुचा Ex, पुढे जे घडलं ते धक्कादायक ....

मुंबई : सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होतच असतात. भारतीय लग्नात तर अनेक सुख-दुःखाचे क्षण येत असतात. या क्षणांमुळे लग्नसमारंभाची शोभा वाढते. मात्र आता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात. ते पाहून तुम्हाला थोडं वेगळं वाटू शकतं. लग्नात प्रत्येक गोष्ट हल्ली रेकॉर्ड केली जाते. यामध्ये एक असाच प्रसंग रेकॉर्ड झाला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

लग्नात पोहोचला नववधुचा Ex 

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास प्रसंग. लग्नानंतर अनेकांचं जीवन बदलून जातं. लग्नामुळे फक्त दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटूंब एकमेकांशी जोडले जातात. अशावेळी अनेकजण नववधु आणि वर आपला भूतकाळ विसरून पुढील आयुष्याला सुरूवात करतात. 

मात्र या लग्नात तसं झालं नाही. नववधुचा एक्स चक्क लग्नाला उपस्थित राहिला. महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. नववधुचा एक्स तिला भेटण्यासाठी चक्क स्टेजवर पोहोचला. त्याने नववधुला पाहिलं आणि नववधुने आपल्या Ex ला. EX तिला आपल्या हाताने काही तरी भरवतो. पण ती ते टाळते. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

गाणं ऐकून व्हाल इमोशनल 

अनेकदा लग्नातले व्हिडिओ बॉलिवूडच्या आणि पारंपरिक गाण्यावर तयार केले जातात. मात्र इथे वेळच वेगळी होती. या व्हिडिओत नववधुचा Ex येतो आणि तिला लाडू भरवण्याचा प्रयत्न करतो. मात्र नववधु त्याला मानेने नकार देते. यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. मुलगा तेथून निघून जातो. आणि लाडू फेकून देतो. 

Read More