Marathi News> भारत
Advertisement

भारतीय 'कर्णा'चा दानशूरपणा, गरीब पाकिस्तानसाठी मदतीचा हात

त्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने 62 बोअरवेल त्या ठिकाणी खणून घेतल्या.

भारतीय 'कर्णा'चा दानशूरपणा, गरीब पाकिस्तानसाठी मदतीचा हात

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे पारंपारीक शत्रू मानले जातात. सीमेवर असो किंवा खेळाच्या मैदानात जेव्हा विषय पाकिस्तानचा येतो तेव्हा लढाई ईर्षेची होते. पण एका भारतीयाच्या मोठ्या मनाचं खुद्द पाकिस्तानमध्ये तोंडभरून कौतूक होत आहे. या भारतीयाने असं काही केलंय की पाकिस्तानी नागरिक याचा ऋणी राहणे पसंत करत आहे. दुबईतील एका भारतीय व्यावसायिकाने पाकिस्तानच्या दक्षिण-पूर्व सिंध प्रांतातील अत्यंत गरीब भागात एक दोन नव्हे तर 63 बोअरवेल (हॅंडपंप) दान केल्या आहेत. 

हॅंडपंप म्हटलं की आपल्याला सनी देओल आणि गदर आठवतो. पण एका भारतीयाने याचा वेगळाच आदर्श घालून दिला आहे. जोगिंदर सिंह सलारिया असे या दिल दरीया भारतीयाचे नाव आहे. पाकिस्तानच्या थारपरकर जिल्ह्याची पाण्याविना दुर्दशा झाली आहे. जोगिंदर यांना याची माहिती सोशल मीडियातून मिळाली. त्यांनी देशादेशातील वादाची पार्श्वभूमी न पाहता सढळहस्ते मदत केली. त्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने 62 बोअरवेल त्या ठिकाणी खणून घेतल्या. त्याची दिलदारी एवढ्यावरच थांबली नाही. तर त्याने अन्नधान्याच्या गोन्या देखील दान केल्या. 

सलारिया हे 1993 पासून संयुक्त अरब अमीरात येथे राहत आहेत. ते परिवहन व्यवसायाशी संबंधित आहेत. ते फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्याशी संपर्क साधला आणि गरजूंना आर्थिक मदत केली. 

Read More