Marathi News> भारत
Advertisement

Good News : भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा, 0.4 टक्क्यांनी वाढ

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या काळात, चालू आर्थिक वर्षात सलग दोन तिमाही घसरणीनंतर ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिसर्‍या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वाढली.  

Good News : भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा, 0.4 टक्क्यांनी वाढ

मुंबई : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या काळात, चालू आर्थिक वर्षात सलग दोन तिमाही घसरणीनंतर ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिसर्‍या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) 0.4 टक्क्यांनी वाढली. ही भारताच्या  ( India) अर्थव्यवस्थेसाठी (Economy) गुड न्यूज आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, आर्थिक वर्ष 2019-20 च्या याच तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये 3.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विकासदर पुन्हा एकदा शून्याच्यावर आला आहे. उणे विकासदराचा काळ आटोपला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकासदर 0.4 टक्के वाढला आहे. कोरोनाचा लॉकडाऊन संपल्यावर अर्थव्यवस्था सुधारली आहे. गेल्या सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या तिमाहीत विकासदर उणे 7.4 टक्के होता.

जीडीपीमध्ये घट होण्याचा अंदाज

एनएसओच्या राष्ट्रीय लेखाच्या दुसर्‍या अग्रिम अंदाजानुसार 2020-21मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) टक्के घसरण झाली आहे. जानेवारीत एनएसओने चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेत 7.7 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला होता. एक वर्षापूर्वी 2019-20 मध्ये जीडीपीमध्ये 4 टक्के वाढ झाली होती.

चालू आर्थिक वर्षाचा पहिला तिमाही - घट 

कोरोना विषाणूचा साथीचा रोग आणि त्यापासून बचाव करण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये 24.4 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी जुलै-सप्टेंबरच्या दुसर्‍या तिमाहीत जीडीपी 7.3 टक्क्यांनी घसरला. ऑक्टोबर-डिसेंबर 2020 मध्ये चीनची अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांनी वाढली. जुलै-सप्टेंबरमध्ये हा विकास दर 9.9 टक्के होता.

जानेवारीत आठ मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात 0.1 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली. त्याचवेळी, प्रामुख्याने खत, स्टील आणि वीज उत्पादन वाढविण्यामुळे ही वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार जानेवारी 2020 मध्ये या भागांच्या उत्पादनात 2.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंटचे उत्पादन घटले. तथापि, खते, स्टील आणि विजेच्या उत्पादन अनुक्रमे 2.7. टक्के, 2.6 टक्के आणि 5.1 टक्क्यांनी वाढले. एप्रिल ते जानेवारी 2020-221 दरम्यान या भागांच्या उत्पादनात मागील वर्षीच्या याच कालावधीत 8.8 टक्क्यांनी वाढ झाली होती. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात आठ प्रमुख उद्योगांचे योगदान 40.27 टक्के आहे.

Read More