Marathi News> भारत
Advertisement

शाहरुख खानसमवेत फक्त काही खास व्यक्तींकडे आहे हा लाल रंगाचा पासपोर्ट; काय आहे त्याचं महत्त्वं?

Passport Colour: पासपोर्टच्या नियमांमध्ये मागील काही वर्षांपासून बरेच बदल झाले आहेत. पण, तुम्हाला माहितीये का काही खास व्यक्तींकडे खास रंगाचे पासपोर्ट का आहेत? 

शाहरुख खानसमवेत फक्त काही खास व्यक्तींकडे आहे हा लाल रंगाचा पासपोर्ट; काय आहे त्याचं महत्त्वं?

Passport Colour: देशांतर्गत प्रवासासाठी सहसा केंद्र शासन प्रमाणित पुरावा किंवा अधिकृत ओळखपत्र वगळता फारशी कागदपत्र दाखवावी लागत नाहीत. मात्र परराष्ट्रात जाण्यासाठी अर्थात देशाच्या सीमा ओलांडून विमान मार्गानं प्रवेश करण्यासाठी मात्र पासपोर्ट सोबत असणं बंधनकारक असतं. परदेशात असतानाही पासपोर्ट सोबत ठेवण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण हा तोच एकमेव पुरावा असतो ज्या आधारे तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये प्रवेश करू शकता. 

भारतात सहसा बहुतांश नागरिकांना गडद निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. पण, काही मंडळींकडे मात्र लाल आणि पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट असल्याचं पाहायला मिळतं. पण, असं का? बी टाऊनचा किंग अभिनेता शाहरुख खान याच्याकडेही हा लाल रंगाचा पासपोर्ट आहे असं म्हणतात. यामागचं कारण माहितीय? 

भारतात पासपोर्टमध्ये रंगांची विभागणी असून त्यानुसार व्यक्तीची ओळख ठरवली जाते. इथं पासपोर्ट निळा, पांढरा आणि मरून किंवा गडद लाल रंगात उपलब्ध असतो. सर्वसामान्य नागरिकांना सहसा निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो, ज्या माध्यमातून त्यांना परदेशात प्रवास करता येतो. नोकरी, शिक्षण, आरोग्य अशा कारणांनी या पासपोर्टच्या मदतीनं परदेशात  प्रवास करता येतो. 

पांढरा पासपोर्ट 

एखाद्या सरकारी कामासाठी परदेशवारी करणाऱ्या व्यक्तींना पांढरा पासपोर्ट दिला जातो. एखाद्या व्यक्तीकडे असा पासपोर्ट आढळल्यास ती व्यक्ती सहसा सरकारी अधिकारी आहे हे अधोरेखित होतं. 

हेसुद्धा वाचा : ज्याने महिंद्रा स्कॉर्पिओ बनवली, 'तोच' कित्येक वर्षानी ती कार खरेदी करायला पोहोचला, आनंद महिंद्रा झाले भावूक

लाल/ मरुन पासपोर्ट 

अभिनेता शाहरुख खान किंवा त्याच्यासारख्याच इतर काही खास व्यक्तींकडे मरून किंवा गडद लाल रंगाचा पासपोर्ट असतो. राजदूत, वरिष्ठ अधिकारी अशा व्यक्तींना हा पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तींना परदेशात प्रवासासाठी व्हिसा काढावा लागत नाही, शिवाय इमिग्रेशन पॉलिसी प्रक्रियाही सहजगत्या पार पडते. सरकारच्या वतीनं पासपोर्ट जारी करण्यात येत असून, त्याच्या वैधतेची एक ठराविक तारीख असते. ज्यानंतर पासपोर्ट ऑनलाईन अर्ज करत Renew करणं अपेक्षित असतं. 

Read More