Marathi News> भारत
Advertisement

चारही दिशेनं येतात ट्रेन... भारतात कुठंय Diamond Crossing? पाहूनच डोकं चक्रावेल

Indian Railways Interesting Facts: भारतात रेल्वे सुविधा देणाऱ्या भारतीय रेल्वे विभागासंदर्भातील काही गोष्टी इतक्या कमाल आहेत की त्याविषयी जाणून तुम्हीही थक्क व्हाल. 

चारही दिशेनं येतात ट्रेन... भारतात कुठंय Diamond Crossing? पाहूनच डोकं चक्रावेल

Indian Railways Interesting Facts: रेल्वेनं प्रवास करत असताना अनेकदा काही अशा गोष्टी नजरेस पडतात, ज्या कळत नकळत आपल्या विचारांमध्ये जागा मिळवून जातात. हे असंच का, ते तसंच का? अशा प्रश्नांचा काहूरही माजवतात. असाच एक प्रश्न आहे देशभरात पसरलेल्या रेल्वे रुळाच्या जाळ्याचा. 

रेल्वे प्रवास करताना खिडकीतून डोकावल्यास पसरलेलं रेल्वे रुळांचं जाळं नकळतच लक्ष वेधून जातं. बऱ्याचदा हे रुळच चालत आहेत की काय, असा भासही होतो. यापैकी काही रुळ एकमेकांशी जोडलेले असतात, काही रुळ नवं वळण घेतात. आश्चर्याची बाब म्हणजे रुळ बदलत ही रेल्वे अपेक्षित स्थानकांवर पोहोचते आणि प्रवास सुकर करते. रेल्वे रुळांचाच एक प्रकार असणाऱ्या, डायमंड क्रॉसिंगविषयी तुम्ही कधी ऐकलं आहे का? 

डायमंड क्रॉसिंग म्हणजे नेमकं काय? 

डायमंड क्रॉसिंग ही एका विशेष प्रकारची क्रॉसिंग असून, ती महत्त्वाच्या परिस्थितीमध्येच तयार केली जाते. रेल्वे रुळाच्या जाळ्यातील हा एक असा बिंदू असतो जिथं चारही बाजूंनी रेल्वेगाड्यांची ये-जा होते. अर्थात इथं चारही बाजूंनी रेल्वे क्रॉसिंग होतं. यामध्ये रेल्वे रुळ एकमेकांना छेदून निघतात आणि एक अशी आकृती तयार करतात जिथं हा आकार एखाद्या उभ्या चौकडीसारखा किंवा सोप्या शब्दांत सांगावं तर एखाज्या शंकरपाळीसारखा दिसतो. 

डायमंड रेल्वे क्रॉसिंगमध्ये जवळपास चार ट्रॅक असतात. जिथं दोन-दोन रुळ एकमेकांना छेदतात. प्रथमदर्शनी हा आकार एखाद्या हिऱ्यासारखाही दिसतो. त्यामुळं या रचनेला डायमंड क्रॉसिंग असंही म्हणतात. ज्याप्रमाणं एखाद्या रस्त्यावर चारही बाजूंनी वाट जाऊन मध्ये एक आकार तयार होतो अगदी तसाच आकार रेल्वे रुळांमुळंही तयार होतो. डायमंड क्रॉसनं रेल्वे पुढे जात असताना अशा पद्धतीनं नियोजन केलं जातं की कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही. 

प्रत्यक्षात भारतभर रेल्वेचं जाळं पसरलं असलं तरीही डायमंड क्रॉसिंगची ही रचना फक्त नागपूरमध्येच पाहायला मिळते. नागपूरमधील संप्रीती नगर स्थित मोहन नगर इथं ही डायमंड क्रॉसिंग आढळते. या अनोख्या क्रॉसिंगमधील एक रुळ हा पूर्वेकडून गोंदियाहून येतो, दुसरा रुळ दक्षिण भारतातून येत आणि एक रुळ दिल्लीतून येतो. दिल्लीतून येणारा हा रुळ उत्तरेकडून आलेला असून पश्चिमेकडून म्हणजेच मुंबईच्या दिशेनं येणारा रुळही या डायमंड क्रॉसिंगला जोडला जातो. या क्रॉसिंगनं एकाच वेळी दोन रेल्वे पुढे जाणं शक्यच नसून, इथून जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेची वेगळी वेळ निर्धारित आहे. 

Read More