Indian Railway Facts : रेल्वे... प्रवास अगदी सुकर करणारं दळणवळणाचं एक कमाल साधन. अनेकजण तर या या रेल्वेची मुळात कल्पनाच ज्या व्यक्तीला सुचली त्या व्यक्तीचं संधी मिळेल तेव्हा कौतुक करण्यास विसरत नाहीत. अशा या रेल्वेचं भारतातील जाळंसुद्धा जगभरात चर्चेचा विषय. देशभरात पसरलेल्या या रेल्वेमुळं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात सहजपणे प्रवास करता येतो. याच रेल्वे प्रवासातली एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये का?
भारतीय रेल्वेनं दर दिवशी कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा कमी अंतराचा... रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते. लांबच्या अंतराला अनुसरून केलेला प्रवास पाहिल्यास सहसा रेल्वे स्थानकामध्ये विविध रंगांच्या आणि प्रामुख्यानं लाल, निळ्या रंगांच्या रेल्वेगाड्या उभ्या दिसतात. पण, या रंगांमधून रेल्वे नेमतं काय सांगू इच्छित असते माहितीये?
भारतीय रेल्वेच्या निळ्या रंगाच्या कोचला इंटीग्रल कोच (ICF) असं म्हणतात. आयसीएफ कोच हे रेल्वेचे पारंपरिक कोच असून, त्यांची रतना आयसीएफ, पेराम्बुर, चेन्नईकडून अर्थात तामिळनाडूत असणाऱ्या इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आलेली आहे. 1952 पासून हे कोच भारतीय रेल्वेसेवत दाखल झाले.
रेल्वेतील लाल रंगाच्या कोचला एलएचबी कोच (LHB Coach) असं म्हणतात. हे कोच जर्मनीतील लिंक-होफमॅन-बुश (Linke Hofmann Busch) कडून तयार केले जात असून, सध्या मात्र त्यांची निर्मिती भारतातच होत आहे. साधारण 2000 पासून हे कोच तयार करण्यात सुरुवात झाली असून मुळच्या जर्मनीतून आलेल्या आराखड्याचे हे कोच सध्या रेल कोच फॅक्ट्री कपूरथला इथं तयार केले जातात.
उपलब्ध माहितीनुसार कोणत्याही दुर्घटनेमध्ये आयसीएफ अर्थात निळ्या रंगाच्या कोचचे डबे एकमेचांवर चढतात कारण त्यामध्ये 'ड्युअल बफर सिस्टीम' लावलेली असते. मात्र एचएलबी अर्थात लाल रंगाचे कोच दुर्घटनेमध्ये एकमेकांवर चढत नाहीत. सेंटर बफर प्रणालीमुळं ही क्रिया होत नाही, ज्यामुळं जिवीत आणि वित्ताची कमी हानी होते.
रेल्वेचा आयसीएफ कोच स्टीलपासून तयार केलेला असून त्याचं वजनही जास्त असतं. तर, एचएलबी चोक स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले असल्यानं ते वजनानं अधिक हलके असतात. आयसीएफ कोचच्या तुलनेत त्यांचं वजन साधारण 10 टक्क्यांनी कमी असतं.
राहिला मुद्दा वेगाचा, तर उर्जा निर्माण करण्यासाठी निळ्या रंगांच्या कोचमध्ये डायनेमो लावलेले असतात, ज्याचा परिणाम रेल्वेच्या वेगावर होतो. मात्र हे कोच ताशी 160 किमी इतक्या वेगानं धावतात, असं असलं तरीही त्यांची कमाल वेग मर्यादा मात्र 120 किमी प्रतितास इतकीच ठेवण्यात आली आहे. एलएलबी म्हणजेच लाल रंगाच्या कोचमध्ये मात्र डायनेमो नसल्यानं वेगाच्या बाबतीत निळ्या रंगाचे कोच सरशी करतात. आहे की नाही ही माहिती कमाल?