Indian Railway : कोकण रेल्वेनं केलेला प्रवास प्रत्येकासाठीच खास असतो. त्यातूनही पावसाळ्यातून कोकण रेल्वे उशिरानं धावली तरीसुद्धा हा नजर खिळवणारा प्रवास मात्र अनेकांनाच हवाहवासा वाटतो. गावखेड्यातून कोकणची वाट काढत पुढे जाणारी ही रेल्वे जणू एका वेगळ्याच दुनियेत अर्थात कोकणात आणून सोडते. कोकणकरांचा तिच्यावर विशेष जीव. पण, आता याच कोकण रेल्वेच्या प्रवासाला तोडीस तोड ठरेल असा रेल्वेमार्ग प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज झाला आहे.
देशाच्या एरा अतिशय महत्त्वाच्या भागाला रेल्वे जाळ्याच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडणारा हा रेल्वेमार्ग अतिशय खास आहे, कारण स्वातंत्र्याच्या तब्बल 77 वर्षांनंतर तिथं रेल्वे पोहोचत आहे. मिझोरमसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असूवन, राज्याची राजधानी असणाऱ्या आयझोल या ठिकाणाला रेल्वेनं इतर देशाशी जोडलं जाणार आहे. (Aizawl Train Connectivity). यासाठी बैराबी सैरांग रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झां असून, हा टप्पा अतिशय दुर्गम भागातून पुढे येतो.
आतापर्यंत मिझोरममधील नागरिकांचा रेल्वे प्रवास बैराबीपर्यंतच होता. हे ठिकाण आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर असून, आता मात्र या रेल्वेमार्गाचा विस्तार करत थेट रेल्वे आयझोलपर्यंत पोहोचणार आहे. या अतिशय दुर्गम भागात रेल्वेचं जाळं उभं करणं ही अतिशय आव्हानाची बाब असून तो जणू एक चमत्कारच आहे. 2014 मध्ये बैराबी - सैरांग रेल्वेमार्गाच्या बांधकामाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती आणि आता त्यांच्याच हस्ते या रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडेल. जिथं देशाच्या राजधानीपासून अर्थात दिल्लीपासून प्रवास करता येईल.
अतिशय दुर्गम अशा भागात असल्या कारणानं 51.38 किमी अंतराच्या या रुळांसाठी 50 बोगदे आणि 150 हून अधिक पुलांची उभारणी करण्यात आली आहे. समुद्रसपाटीपासून हा रेल्वेमार्ग 81 मीटर इतक्या उंचीवर आहे. या भागात पावसाचं प्रमाण तुलनेनं जास्त असल्या कारणानं रेल्वे प्रवासाचा हा टप्पा कोकणाची आठवण करून देईल किंवा कोकण रेल्वेला टक्करच देईल असं म्हणायला हरकत नाही.
नॉर्थ फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ यांनी या रेल्वेमार्गाचं काम पूर्णत्वास गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून, मिझोरमच्या विकासाच्या दृष्टीनंही ही महत्त्वाची बाब असल्याचं ते म्हणाले. दरम्यान , रस्तेमार्गानं गुवाहाटीला पोहोचायचं झाल्यास 18 तासांचा कालावधी लागतो. मात्र रेल्वे प्रवासामुळं ही वेळ 12 तासांवर आली आहे. या रेल्वेमार्गासाठी विशेष भूकंपरोधी तंत्राचा वापरही करम्यात आला आहे. प्राथमिक माहिचीनुसार गुवाहाटी ते आयझोल या रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांना 450 रुपये मोजावे लागणार आहेत.