Marathi News> भारत
Advertisement

50 की 90 kmph? धावत्या ट्रेनमध्ये वेगावरुन लोकोपायलेटमध्ये वाद; दोघे भांडत असताना ट्रेननं सिग्नल तोडला अन्...

Indian Railway : क्षुल्लक कारणावरून लोको पायलटमध्ये वाद झाला आणि भरधाव रेल्वे... त्यावेळी नेमकं काय घडलं? पाहा राजस्थान रेल्वे अपघातासंदर्भातील मोठी बातमी   

50 की 90 kmph? धावत्या ट्रेनमध्ये वेगावरुन लोकोपायलेटमध्ये वाद; दोघे भांडत असताना ट्रेननं सिग्नल तोडला अन्...

Indian Railway News : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या अंतराचे प्रवास किमान वेळात करणं सहज शक्य झालं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक भाग या रेल्वेच्या जाळ्यामुळं जोडण्यात आले आहेत. दक्षिण भारतातून उत्तर भारत रेल्वेनं गाठणं अगदी सहज शक्य झालं आहे. अशा या रेल्वे विभागात नुकतीच घडलेली एक घटना चिंतेचा विषय ठरत असून, रेल्वे प्रशासनानंही यामध्ये लक्ष घातलं आहे. यामागचं कारणंही तितकंच गंभीर. 

सोमवारी राजस्थानातील अजमेर येथे साबरमती-आग्रा कँट सुपरफास्ट एक्सप्रेस (12548)चा अपघात झाला. रात्री उशिरानं ही भरधाव वेगातील रेल्वेगाडी रुळावरून घसरली. इंजिनसह रेल्वेचे चार डबे रुळावरून घसरल्यामुळं गाढ झोपेत असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला आणि रेल्वेतून किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीतून एक धक्कादायक आणि तितकीच चिंतेची बाबही समोर आली. 

काय होतं रेल्वे अपघातामागचं कारण?

राजस्थानातील अजमेर येथे सोमवारी झालेल्या रेल्वे अपघातामागे रेल्वेतील लोको पायलट आणि असिस्टंटच जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. किंबहुना दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान हे मान्यही केलं आहे. रेल्वेच्या वेगावरून त्या दोघांमध्ये हा वाद झाला. या वादामध्ये दोन्ही लोको पायलट सिग्नलवर ब्रेक लावायला विसरले आणि जेव्हा रेल्वेला ब्रेक लावला तेव्हा ती ताशी 90 किमी इतक्या वेगानं धावत होती. ज्यामुळं रेल्वेचे चार डबे आणि इंजिन जवळून जाणाऱ्या मालगाडीला धडकून रुळावरून घसरले. 

हेसुद्धा वाचा : हे काय झालं? Zomato नं शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीबाबत तडकाफडकी घेतला मोठा निर्णय ​

लोको पायलट नानकराम आणि सहाय्यक लोको पायलट सुलाल अशी दोन्ही लोको पायलटची नावं असून, नानकराम यांनी रेल्वेचा वेग 90 किमी इतका ठेवला होता. तर, सुलाल यांनी 50 किमी वेग असावा असं म्हटलं आणि तिथंच त्यांचा वाद झाला. वादाच्या नादात दोघंही सिग्नल विसरले. नानकराम यांच्या माहितीनुसार सर्व सिग्नल मिळत असूनही सुलाल यांनी त्यांना थांबवलं. मालगाडी सिग्नलच्या पुढेच होती तितक्यात आपात्कालीन ब्रेक लावले आणि या धडकेमुळं रेल्वे रुळावरून घसरली. 

Read More