Marathi News> भारत
Advertisement

Vande Bharat मधून भिकाऱ्याचा प्रवास! TC ने तिकीट विचारलं असता...; Video तुफान Viral

Indian Railway News: सोशल मीडियावर सध्या या प्रवासाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय ठरतोय.

Vande Bharat मधून भिकाऱ्याचा प्रवास! TC ने तिकीट विचारलं असता...; Video तुफान Viral

Beggar On Vande Bharat Train: भारतामधील सर्वाधिक आलिशान आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील ट्रेन्सच्या यादीमध्ये 'वंदे भारत'चा समावेश होतो. वेगवान प्रवास आणि अगदी विमान प्रवासात मिळतात तशा सोयीसुविधांमध्ये अल्पावधीत 'वंदे भारत' प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत असतानाच अनेकजण आजही या ट्रेनमध्ये बसलेले नाहीत. मात्र या आलिशान ट्रेनमध्ये एखादा भिकारी भीक मागताना दिसला तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र अशा खास ट्रेनमध्ये खरोखरच भिकारी शिरला तर तिकीट तपासणीस म्हणजेच टीसी, प्रवासी आणि ट्रेनमधील कर्मचारी कसा प्रतिसाद देतील? याचीच झलक एका व्हिडीओत पाहायला मिळाली.

'वंदे भारत'मध्ये भिकारी शिरला तर...

खरोखरच 'वंदे भारत'मध्ये भिकारी शिरला तर काय होईल याची चाचपणी करण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. 'एक्सपिरिमेंट किंग' नावाच्या युट्यूब चॅनेलवर सोशल एक्सपिरिमेंट म्हणून शिवराज नवाच्या व्यक्तीला भिकाऱ्याच्या वेशात ट्रेनमध्ये पाठवलं. हा तरुण शताब्दी आणि 'वंदे भारत' या दोन्ही ट्रेन्समध्ये भिकारी म्हणून शिरल्यानंतर काय झालं हे फारचं रंजक आहे. अशा आलिशान ट्रेनमध्ये भिकाऱ्याला पाहून काय वाटेल हे या टीमला कॅमेरात कॅप्चर करायचं होतं. फाटलेले कपडे, मळका चेहरा अशा अवतारामध्ये हा तरुण या ट्रेनमध्ये ठरला. या टीमने पाच ते सहा सीट्स बुक केल्या होत्या आणि त्यांनी भिकारी बनून फिरणाऱ्या या आपल्या मित्रासोबत लोक कसे वागतात हे पाहण्यासाठी संपूर्ण प्रवास केला.

शताब्दी ट्रेनमध्ये भिकारी बनून प्रवास करताना काय झालं?

भिकारी बनून वावरणारा शिवराज हा फटकी बनियान परिधान करुन तिकीट आणि आधारकार्डसहीत जयपूर रेल्वे स्थानकामध्ये पोहोचला. त्याने सायंकाळी साडेपाच वाजताची जयपूरवरुन सुटणारी शताब्दी ट्रेन पकडली. शिवारजसोबतचे सहकारी ट्रेनमध्ये चढून ठरलेल्या ठिकाणी बसले. त्यानंतर शिवराज भिकाऱ्याच्या वेशात ट्रेनमध्य चढू लागला असता त्याला कर्मचाऱ्याने रोखलं मात्र तिकीट पाहिल्यावर ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला. या महागड्या ट्रेनमध्ये भिकाऱ्याला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कर्मचारी आणि टीसीने शिवराजला अडवलं. मात्र तिकीट आणि आधार कार्ड पाहिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. 

'वंदे भारत'मध्ये भिकाऱ्याला पाहून...

दुसऱ्या दिवशी सायंकाळी शिवराज आणि त्याच्या टीममध्ये अशाप्रकारे भिकाऱ्याच्या वेशात ज्याप्रकारे शताब्दीमध्ये प्रवास केला तसाच प्रयोग चंदीगढ- अजमेर 'वंदे भारत' ट्रेनमध्ये केला. सायंकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी सुटणाऱ्या 'वंदे भारत' ट्रेनमध्ये चढताना शिवराजला विरोध सहन करावा लागला. त्याला अनेकदा रोखण्यात आलं. मात्र आधार कार्ड आणि तिकीट तपासून त्याला ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र संपूर्ण प्रवासात वारंवार भिकारी बनून प्रवास करणाऱ्या शिवराजकडे रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिकीटाची विचारणा केली. अजमेरमध्येही त्याला टीसीने पकडलं. मात्र तिकीट दाखवल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

या व्हिडीओमधून केवळ दिसण्यावरुन कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला वारंवार त्याच्याकडील तिकीट आणि ओळख पत्राचा पुरावा दाखवावा लागला हे अधोरेखित झालं.

Read More