Marathi News> भारत
Advertisement

4 पैकी फक्त 2 रेल्वे तिकीटं कन्फर्म झाली, तरी चौघांनाही प्रवास करता येतो? Indian Railway चा नियम काय सांगतो?

Partially Confirmed Train Ticket : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक नवा नियम लागू. कोणाला होणार या नियमाचा फायदा? पाहा...   

4 पैकी फक्त 2 रेल्वे तिकीटं कन्फर्म झाली, तरी चौघांनाही प्रवास करता येतो? Indian Railway चा नियम काय सांगतो?

Partially Confirmed Train Ticket : (Indian Railway) भारतीय रेल्वेनं दर दिवशी कोट्यवधीच्या संख्येनं प्रवासी प्रवास करतात. कमी अंतरापासून ते अगदी लांब पल्ल्यावरील अंतरापर्यंत हा प्रवास केला जातो. या प्रवासादरम्यान रेल्वेनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करणं प्रवाशांसाठी बंधनकारक असून, नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना कायद्याच्याच चौकटीत राहून धडासुद्धा शिकवला जातो. याच रेल्वेकडून प्रवासासाठी काही असेही नियम आखण्यात येतात जिथं प्रवास सुकर करण्याचाच हेतू केंद्रस्थानी ठेवला जातो. मात्र अनेकांच्या बाबतीत व्हायचा तो घोळ होतोच. 

तिकीट कन्फर्म होण्याचा गोंधळ... 

अनेकदा असं होतं, की एखाद्या प्रवासासाठी चारजण एकत्र निघण्याची तयारी करतात. मात्र गर्दी, तिकीटांची मागणी यांसारख्या कारणांमुळं दोनच तिकीटं कन्फर्म होऊन दोन तिकीटं मात्र कन्फर्म होत नाहीत, म्हणजेच ती वेटिंग लिस्टमध्ये राहतात. अशा स्थितीमध्ये प्रवास नेमका कसा आणि कोणी करायचा, चौघांनीही प्रवास केला तर चालणार आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न पडतात. याच प्रश्नांचं रेल्वेनं मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. 

रेल्वे नियमानुसार... 

1 मे 2025 पासून रेल्वेचा एक नवा नियम लागू झाला असून, त्यानुसार आता रेल्वेमधून फक्त अशाच प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे. एखाद्या प्रवाशाकडे वेटिंग लिस्ट (Waiting List Ticket) असेल आणि चार्ट तयार झाल्यानंतरही त्यांची तिकीट कन्फर्म झाली नसेल, तर त्या प्रवाशाला रेल्वेच्या कोणत्याही डब्यातून प्रवासाची मुभा नाही. 

शिक्षा आणि दंड भरण्यास तयार व्हा.... 

तिकीट ऑनलाईन पद्धतीनं बुक करूनही ते यादी लागेपर्यंत कन्फर्म न झाल्यास IRCTC कडून ते तिकीट रद्द करून प्रवाशांना त्यांचे पैसे परत देण्यात येतात. त्यासाठी वेगळी कोणतीही प्रक्रिया किंवा अर्ज करावं लागत नाही. मात्र वेटिंग लिस्टमध्ये नाव असतानाही एखाद्या प्रवाशानं रेल्वेतून प्रवास केला आणि ही बाब टीटीईच्या लक्षात आली तर मात्र या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. 

तिकीट कन्फर्म झालं नाही, अखेरच्या क्षणी काय करावं? 

कोणत्याही परिस्थितीत प्रवास करायचाच असेल तर प्रवाशांनी थेट स्टेशनवरून तिकीट खिडकीवर जाऊन जनरल डब्यातील तिकीट खरेदी करावं किंवा युटीएस मोबाईल अॅपवरून जनरल तिकीट बुक करावं. जनरल अर्थात सर्वसाधारण श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी हे तिकीट आवश्यक ठरतं. मात्र विनातिकीट या डब्यातही प्रवास करण्याचं धाडस नकोच! 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे जर वेटिंगचं तिकीट आरएसी झालं तर प्रवाशांना रेल्वे प्रवासाची परवानगी असते. मात्र इथं एक सीट दोन प्रवाशांमध्ये विभागून दिली जाते, तिकीटाचं भाडं मात्र पूर्ण आकारलं जातं. परिणामी तुम्ही जर कुटुंबासमवेत किंवा मित्रमंडळींसमवेत प्रवास करणार असा आणि सर्वांची तिकीटं कन्फर्म झालेली नाहीत तर रेल्वेची अंतिम यादी बनेपर्यंत वाट पाहा. तिकीट तरीही कन्फर्म न झाल्यास जनरल तिकीटावर रेल्वे प्रवास करण्याचा पर्याय निवडा. 

Read More