Marathi News> भारत
Advertisement

तात्काळ तिकीट बुकिंग करायचंय, तर सगळ्यात आधी हे एक काम करा; रेल्वेचा हा निर्णय आजपासून लागू

Tatkal Ticket Booking Rule Change From 15 July: रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

तात्काळ तिकीट बुकिंग करायचंय, तर सगळ्यात आधी हे एक काम करा; रेल्वेचा हा निर्णय आजपासून लागू

Tatkal Ticket Booking Rule Change From 15 July: तुम्ही देखील ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आजपासून रेल्वेने तिकीट नियमांत मोठा बदल केला आहे. ट्रेनच्या तात्काळ तिकीट बुकिंग सिस्टममध्ये पारदर्शकता यावी आणि एजंटच्या आरेरावीला लगाम लावण्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगचा नवीन नियम लागू केला आहे. नवीन नियमांनुसर, आज 15 जुलैपासून तुम्ही विना आधार व्हेरिफाइड IRCTC अकाउंटवरुन तत्काळ तिकीट बुक करु शकणार नाहीत. 1 जुलैपासून रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगसाठी OTP ची सर्व्हिस सुरू केली होती. ही सर्व्हिस 15 जुलैपासून अनिवार्य केली आहे.

तिकीट एजंटाच्या मनामानीला चाप बसवण्यासाठी तिकीट बुकिंगच्या निमयांत बदल करण्यात आले आहेत. 1 जुलै 2025 पासून ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी युजर्सना OTP द्यावा लागेल. या अतंर्गंत OTP तुमच्या IRCTC अकाउंटला रजिस्टर असणाऱ्या मोबाइलवर पाठवण्यात येईल. 15 जुलैपासून OTP वरुनच तात्काळ तिकीट बुकिंग सिस्टम अनिवार्य करण्यात येणार आहे.

तात्काळ तिकीट कधी बुक करता येणार (When Can Tatkal tickets be booked)

सर्व प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय तत्काळ रेल्वे तिकिटे मिळावीत यासाठी, रेल्वेने एक नवीन नियम बनवला आहे ज्यानुसार एजंटना पहिल्या 30 मिनिटांत तत्काळ तिकिटे बुक करण्याचा अधिकार राहणार नाही. याचा अर्थ एसी कोचसाठी तात्काळ बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते आणि एजंटना सकाळी 10.30 पर्यंत बुकिंग करण्याची परवानगी राहणार नाही. त्याचप्रमाणे, स्लीपरसाठी तत्काळ बुकिंग देखील सकाळी 11 वाजता सुरू होते आणि एजंटना सकाळी 11.30 पर्यंत तत्काळ बुकिंग करण्याचा अधिकार राहणार नाही.

Tatkal Booking Rule for Agents (दलालांसाठी काय आहे नियम)

भारतीय रेल्वेनुसार प्रवाशांना सुविधा आणि चांगला अनुभव देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वे सूत्रांनुसार, रेल्वेने वेटिंग तिकीटच्या संख्येवर मर्यादा आणण्याला निर्णय घेतला आहे. आता ट्रेनमध्ये अधिकाधीक 25 टक्क्यापर्यंत वेटिंग तिकीट जारी केले आहेत. म्हणजेच आधीच्या तुलनेत वेटिंग तिकीटांच्या संख्येत कपात केली जाऊ शकते.

पीपीएम (पॅसेंजर प्रोफाइल मॅनेजमेंट) प्रणाली अंतर्गत प्रवाशांच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तसेच इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गाड्यांचे बुकिंग, रद्दीकरण आणि प्रतीक्षा पद्धती समजून घेण्यात आल्या आहेत.

रेल्वेने नियम का बदलले?

रेल्वेचा असा विश्वास आहे की ज्या गाड्यांमध्ये तिकिटे रद्द करण्याचे प्रमाण जास्त आहे, तिथे वेटिंग तिकिटांची संख्या तुलनेने जास्त ठेवली जाईल. याउलट, ज्या गाड्या रद्द करण्याचे प्रमाण कमी आहे, तिथे तिकिटांची प्रतीक्षा मर्यादा देखील कमी असेल. या पावलामुळे कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांना फायदा होईल आणि त्यांना प्रवासात अनावश्यक गैरसोय टाळता येईल.

Read More