Marathi News> भारत
Advertisement

कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार, तिकीट कॅन्सलेशन चार्जबाबत लवकरच मोठा निर्णय होणार

Train Ticket Refund Rules In Marathi:  रेल्वेचे तिकीट कॅन्सल केल्यानंतर अनेकदा प्रवाशांना कॅन्सलेशन चार्ज भरावे लागतात, त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता.

कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार, तिकीट कॅन्सलेशन चार्जबाबत लवकरच मोठा निर्णय होणार

Train Ticket Refund Rules In Marathi: तुम्हीदेखील ट्रेनने प्रवास करता तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. भारतीय रेल्वे लवकरच तिकीट कॅन्सलेशनवर लागणाऱ्या क्लेरिकल चार्ज कमी करू शकतात किंवा पूर्णपणे रद्द करू शकतात. या पर्यायांवर सध्या रेल्वेकडून विचार करण्यात येत आहे. 

जेव्हा तुम्ही एखादे तिकीट बुक करतात आणि वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही तिकीट कॅन्सल केले तर त्या तिकीटाचे पूर्म रिफंड मिळत नाही. क्लेरिकल फी म्हणून रेल्वे थोडेसे शुल्क कापते. हे शुल्क विविध बोगीनुसार ठरवले जाते. अशावेळी प्रवाशांना दुहेरी धक्का बसता. एकतर रेल्वेचे तिकट कन्फर्म होत नाही आणि रेल्वेकडून कॅन्सलेशनचे चार्ज लागतात. संपूर्ण रिफंडदेखील मिळत नाही. जर रेल्वे तिकीट कॅन्सलेशनवर लागणाऱ्या क्लेरिकल चार्ज पूर्णपणे रद्द करू शकतात. रेल्वेने जर हा निर्णय घेतला तर यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

माहितीसाठी, ऑनलाइन तिकीट काढण्याचे प्रमाण वाढल्याने रेल्वेचा खर्च घटत चालला आहे. अशातच रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचा विचार करत आहेत. आता क्लेरिकल चार्ज म्हणून प्रवाशांना 30 ते 60 रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागते. हा चार्ज वेगवेगळ्या बोगी व क्लासनुसार लागतो. क्लेरिकल चार्ज म्हणून 60 रुपये एसी क्लाससाठी द्यावे लागतात. तर, द्वितीय श्रेणीसाठी रिझर्व्हेशनवर 30 रुपये द्यावे लागतात. 

तिकीट कॅन्सल केल्यानंतर लागणाऱ्या चार्जवर गेल्या कित्येक दिवसांपासून विविध चर्चा होत आहेत. वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास आपोआपच कॅन्सल होते. त्यानंतर त्यावरील काही शुल्क कापून घेतल्यानंतर उरलेले पैसे रिफंड केले जातात. याबाबत लोकांनी अनेकदा तक्रारदेखील केले आहेत. जे तिकीट आपण कॅन्सल केलेच नाही त्यावर रेल्वे चार्ज का लावतात? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला होता. जेव्हा तुम्ही आयआरसीटीसी पोर्टलवरुन तिकीट बुक करता तेव्हादेखील हे चार्ज लावण्यात येतात. त्यामुळं येणाऱ्या काळात रेल्वे यात बदल करणार का?  हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Read More