Marathi News> भारत
Advertisement

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी! रेल्वेच्या प्रवासात लवकरच मिळणार सूट...

Indian Railways : भारतीय रेल्वेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटामध्ये मिळणारी सुट आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. पण, यावेळी मात्र नियमांमध्ये असणार बदल. 

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी! रेल्वेच्या प्रवासात लवकरच मिळणार सूट...

मुंबई : Indian Railways Discount on Ticket :  जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. लोकांच्या मागणीमुळे ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पुन्हा एकदा तिकीटांमध्ये सूट देण्याचा विचार भारतीय रेल्वे करत आहे. असं झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना, खेळाडूंना आणि त्याचबरोबर दुसऱ्या कॅटेगरीच्या प्रवाशांना तिकीटमध्ये कंसेशन (Concession Ticket) मिळू शकतं. ही सेवा बंद केल्यामुळे भारतीय रेल्वेला प्रवाशांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं. 

सूत्रांच्या माहितीनुसार, तिकीटामध्ये मिळणाऱ्या सूटमध्ये काही प्रमाणात बदल करण्याच येऊ शकतील. तिकीटमध्ये मिळणारी सूट ही 70 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या प्रवाशांसाठी मिळू शकते. याआधी ही सुविधा 58 वर्ष वयापेक्षा मोठ्या महिलांसाठी आणि 60 वर्ष वयाच्यापेक्षा मोठ्या पुरुषांसाठी होती. 

याआधी मिळत होती सूट


कोरोना महामारीच्याआधी म्हणजे मार्च 2020 च्याआधी रेल्वेकडून 58 वर्षांपेक्षा मोठ्या महिलांसाठी रेल्वे तिकीटामध्ये 50 टक्के आणि 60 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या पुरुषांसाठी 40 टक्के सूट मिळत होती. प्रवाशांना ही सूट सर्व क्लासच्या तिकीटांमध्ये मिळत होती. पण कोरोनाच्या महामारीनंतर ही सेवा भारतीय रेल्वेकडून बंद करण्यात आली. यामुळे भारतीय रेल्वेला प्रवाशांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं.  

भारतीय रेल्वेचा यावर देखील विचार सुरु 

भारतीय रेल्वेकडून आणखी एका पर्यायबाबत विचार केला जातोय. सर्व रेल्वेमध्ये 'प्रीमियम तत्काल' योजना सुरु व्हावी यासाठी भारतीय रेल्वे विचार करतीये. यामुळे चांगला महसूल मिळण्यासाठी फायदा होईल. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या कंसेशनमुळे निर्माण होणारा आर्थिक भार देखील यामुळे कमी होईल. ही योजना जवळपास 80 रेल्वेंमध्ये लागू आहे. 'प्रीमियम तत्काल योजना' हा रेल्वेद्वारे सुरु केलेला एक कोटा आहे. ज्यामध्ये काही जास्तीची रक्कम घेऊन सीट आरक्षित केलं जातं. हा कोटा अशा प्रवाशांसाठी आहे, जे शेवटच्या काळात तिकीट बुक करताना जास्तीची रक्कम भरु शकतील.

Read More