Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...

Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग...   

धक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...

Indian Railway News : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सातत्यानं प्रयत्न करत असते. प्रवाशांपुढील अडचणींवर तोडगा काढत या यंत्रणा त्यांना प्रवासाचा सुखकर अनुभव देताना दिसतात. अशाच एका अतिशय गंभीर प्रसंगामध्ये रेल्वे पोलीस आणि इतर यंत्रणांनी तातडीनं पावलं उचलत एका लहान मुलीचे प्राण वाचवले. सोशल मीडियावरील व्हिडीओमुळं घडला प्रकार समोर आला. 

नेमकं घडलं तरी काय? 

मध्य प्रदेशाच्या ललिपूर येथील एक कुटुंब आपल्या 8 वर्षांच्या मुलीला घेऊन रेल्वेनं वृंदावनला जात होतं. रात्रीच्या वेळी हवा खेळती रहावी यासाठी डब्याची आपत्कालीन खिडकी उघडी ठेवली होती. त्याच खिडकीतून धावत्या ट्रेनमधून 8 वर्षांची मुलगी पडली. वडिलांनी डोळे उघडेपर्यंत ट्रेन 10 ते 12 किलोमीटर पुढे सरकली होती. घटनेची माहिती होताच एकच खळबळ माजली. ज्यानंतर तातडीनं ट्रेन थांबवून जीआरपी आणि आरपीएफला घटनेची माहिती देण्यात आली. 

घटनेची माहिती मिळताच मुलीचा शोध घेण्यासाठी 16 किमीचा परिसर जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वेच्या टीममध्ये विभागून टार्गेट करण्यात आला. शोध मोहिमेतील सर्व पथकांच्या मेहनतीला अखेर फळ मिळालं. मुलगी रुळाच्या बाजूला जखमी अवस्थेत आढळून आली. तितक्यातच तिथं एक मालगाडी येताना दिसली, रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी मालगाडी थांबवण्यात आली. ललितपूरला पोहोचल्यानंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून, तिच्या पायाला दुखापत झाली आहे, ज्यासाठी तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Read More