Indian Railway Ticket Codes Meaning in Marathi: भारत हे जगातील सर्वात मोठे रेल्वेचे नेटवर्क आहे. लांब पल्ल्याचा प्रवास असताना अनेकजण रेल्वेची तिकीट बुक करतात. मात्र प्रवासी संख्या जास्त असल्याने पहिल्या फटक्यातच तिकीट कन्फर्म होईल की नाही याची वाच पाहावी लागते. पण वेटिंग तिकीटची वाट पाहत बसावी लागते. अशावेळी एक ट्रिक तुमच्या फार उपयोगी ठरू शकते. वेटिंग तिकीटावर काही कोड लिहिलेले असतात हे कोड तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही हे सांगतात. जाणून घेऊयात कोणते हे कोड आहेत आणि त्याचे अर्थ काय आहेत.
वेटिंग तिकीटावर तुम्ही अगदी लक्षदेऊन पाहिलेत तर GNWL, RLWL यासारखे कोड लिहिलेले असतात. हे कोड नेमके काय असतात आणि त्याचा अर्थ काय? तसंच, या कोडमुळं तुमचं तिकीट कन्फर्म होणार की नाही हे देखील कळतं. आता या कोडचा आणि तिकीट कन्फर्म होण्याशी काय संबंध आहे, हे जाणून घेऊयात.
जर तुमच्या तिकीटावर RAC लिहिलेले असेल तर याचा अर्थ तिकीट कन्फर्म झालेले आहे. तुम्ही त्या ट्रेनने प्रवास करू शकता मात्र तुमची सीट ही दोघांमध्ये शेअर केली जाईल. याचा अर्थ तुम्हाला बसायला जागा मिळू शकते मात्र स्लीपर कोच मिळणार नाही. अनेकदा RAC तिकिट कन्फर्म होण्याची दाट शक्यता असते.
GNWL चा अर्थ जनरल वेटिंग लिस्ट असा आहे. हे तिकीट ट्रेन ज्या स्थानकापासून प्रवास सुरू करणार त्या स्थानकापासून जारी केले जाते. ज्या स्थानकातून ट्रेन सुटणार आहे तिथे सर्वाधीक बर्थ असतात त्यामुळं हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अधिक असते.
रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा तुम्ही पहिल्या आणि शेवटच्या स्थानकांव्यतिरिक्त मार्गाच्या आसपासच्या स्थानकांसाठी बुक करतात. GNWL च्या तुलनेत हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता थोडी कमी असते.
मधल्याच एखाद्या स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांनी तिकीट काढल्यास त्याच्या तिकीटावर हा कोड असतो. हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यतादेखील कमी असते.
तात्काळ तोटा म्हणजेच तात्काळ बुकिंगमध्ये कन्फर्म तिकीट न मिळणाऱ्या प्रवाशांना हे तिकीट दिले जाते. या प्रकारात तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता नसतेच. यात प्रवासी तिकीट रद्द करण्याची शक्यतादेखील नसते.
RSWL कोडचा अर्थ रोड साइड स्टेशन वेटिंग लिस्ट असा होतो. जेव्हा ट्रेन मुळ स्थानकावरुन जवळच्या स्थानकांवर तिकीट बुक केले जाते. अशी तिकीटे कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते.