Marathi News> भारत
Advertisement

ढाब्यावर जेवायला थांबलेल्या सैनिकांना मिळालं सप्राइज; VIDEO पाहून भारावले भारतीय

Indian Soldiers Viral Video : भारतीय सैनिकांच्या स्वागताचा 'तो' व्हिडीओ अन् नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

ढाब्यावर जेवायला थांबलेल्या सैनिकांना मिळालं सप्राइज; VIDEO पाहून भारावले भारतीय

Indian Soldiers Viral Video : गेल्या बऱ्याच दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पाहता सगळ्यांचं लक्ष हे सैनिकांवर आहे. सगळेच भारतीय हे देशाच्या सैन्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या हापुडच्या लोकांनी त्यांच्या ढाब्यावर पोहोचलेल्या भारतीय सैनेचं कसं स्वागत केलं. जे पाहुन तुम्हाला देखील आनंद होईल.  

खरंतर, सैनिकांची एक तुकडी हापुडमध्ये स्थित शिवा ढाब्यावर जेवण्यासाठी थांबली होती. या दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच त्यांचे स्वागत आणि कौतूक करण्यासाठी असं काही केलं की सगळीकडे त्याचीच चर्चा केली आहे. त्यांनी एकत्र येऊन भारतीय सेनेसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यासोबत त्यांच्यावर फूलांचा वर्षाव केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. 

ढाब्यावर जेवणं करायला आलेल्या सैनिकांच्या स्वागत केलं. या व्हिडीओमध्ये ढाब्यावर जेवूण करून झाल्यानंतर तिथून ते पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असताना तिथे असलेल्या लोकांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' अशा घोषणा दिल्या. त्यासोबतच तिथे असलेल्या लोकांनी त्यांना पाण्याची बॉटल दिली. या व्हिडीओला पाहून सगळ्यांनी तिथल्या लोकांचे कौतूक केले आहे. 

या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिथल्या लोकांची स्तुती केली आहे. सैनिकांचे असे स्वागत केलेलं पाहून सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ज्यांनी हा विचार केला त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. कारण जे आपली सुरक्षा करत आहेत त्यांची सुरक्षा करणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की जय जवान जय किसान जय हिंद हिंदुस्तान. तर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर भारतीय सैनेला सलाम केला आहे.

हेही वाचा : Mother's Day 2025 : करिश्मा, मलायका ते नीना गुप्ता 'या' आहेत बॉलिवूडच्या Single Mom

पहलगाम हल्ला आणि त्याचं उत्तर...

पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ला केला. तर या हल्ल्यात दहशतावाद्यांनी 26 पर्यटकांचा धर्म विचारत त्यांची हत्या केली. त्यानंतर भारतानं यावर अ‍ॅक्शन घेत 6 ते 7 च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि त्यासोबत काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न केले. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असतानाच अचानक 10 मे रोजी शस्रसंधी म्हणजेच दोन्ही बाजूने गोळीबार आणि लष्करी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Read More