Indian Student Killed In Canada: कॅनडामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एका 21 वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. हरसिमरत रंधावा ही तरुणी मेडिकलची विद्यार्थिनी होती. हत्येप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जेरडाइन फोस्टर नावाच्या या व्यक्तीला 5 ऑगस्ट 2025 रोजी ओंटारियोच्या नियाग्रा फॉल्समधून अटक करण्यात आली. त्याच्यावर फर्स्ट डिग्री मर्डर आणि हत्येचा प्रयत्न असे खटले दाखल करण्यात आले आहेत.
बॅरीटुडे डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार गुरुवारी 7 ऑगस्ट 2025 रोजी डिटेक्टिव सार्जेंट डेरिल रीडने सांगितलं की जेम्स स्ट्रीट आणि साउथ बेंड रोड च्या भागात झालेल्या या घटनेत जवळपास 7 लोकं, 4 गाड्या आणि अनेक बंदुका सामील होत्या. असं सांगितलं जातंय की जवळच्या एका घरातील खिडकीमधून सुद्धा गोळ्या झाडण्यात आल्या पण त्यात घरातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. रीडने सांगितले आहे की, याबाबत आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही, कारण प्रकरण न्यायालयात आहे. डिटेक्टिव रीडने सांगितल्यानुसार आरोपीचं हाल्टन, हॅमिल्टन आणि नियाग्रा या भागांशी संबंध आहे. ते त्याठिकाणी भाडेतत्वावर राहायचे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार हत्याप्रकरणातील तपास अजून सुरु आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार 17 एप्रिल 2025 रोजी गोळीबार होण्यापूर्वी एक हिंसक झडप झाली होती. त्यावेळी भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा ही अपर जेम्स स्ट्रीट आणि साउथ बेंड रोडवर बसची वाट बघत होती. या दरम्यान अचानक गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात हरसिमरत रंधावाला गोळी लागली, तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले पण तिथे तिचा मृत्यू झाला. हरसिमरत रंधावा हॅमिल्टन पोलिसांनी सांगितलं की, 'घटनास्थळी पोहोचलो तेव्हा हरसिमरतच्या हृदयाला गोळी लागली होती. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे तिचा मृत्यू झाला'.
हेही वाचा : क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भावा बहिणीच्या 5 जोड्या, एका भारतीय जोडीचाही समावेश
स्थानीय पोलिसांच्या मते हरसिमरत रंधावा ही निर्दोष होती आणि 2 गटांमध्ये झालेल्या गोळीबारात तिला गोळी लागून तिचा मृत्यू झाला. हत्येचा अधिक तपास केला जात असून हरसिमरतचा एक लहान भाऊ सुद्धा आहे. 2 वर्षांपूर्वी ती मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी कॅनडामध्ये आली होती. हरसिमरतच्या काकांचा मुलगा बलराज सिंहच्या सांगण्यानुसार मोहॉक कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यावर ती फिजियोथेरेपी क्लिनिक सुरु करणार होती.
कॅनडामध्ये हरसिमरत रंधावाचा मृत्यू कसा झाला?
हरसिमरत रंधावा, वय 21 वर्षे, ही भारतीय विद्यार्थिनी 17 एप्रिल 2025 रोजी कॅनडाच्या हॅमिल्टन शहरातील अपर जेम्स स्ट्रीट आणि साउथ बेंड रोड येथे बस स्टॉपवर बसची वाट बघत असताना दोन गटांमधील गोळीबारात लागलेल्या गोळीमुळे मरण पावली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे तिचा मृत्यू झाला
पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?
हॅमिल्टन पोलिसांनी जेरडाइन फोस्टरला अटक केली असून, त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे आरोप ठेवले आहेत. तपास अजूनही सुरु आहे, आणि पोलिस इतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हरसिमरत रंधावा हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे?
हॅमिल्टन पोलिसांचा तपास अजूनही सुरु आहे. जेरडाइन फोस्टरला अटक झाली असली, तरी इतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. प्रकरण न्यायालयात असल्याने अधिक माहिती उघड करण्यात मर्यादा आहेत