Marathi News> भारत
Advertisement

Suez Canal | २५ भारतीयांनी ७ दिवस जहाजावरच थांबून एव्हर गिव्हनला बाहेर काढलं

18 मीटर खोलीपर्यंत वाळू खोदून हे जहाज बाहेर काढण्यात आले. आता ते जहाज इजिप्त येथील ग्रेट बिटर या तलावात हलवण्यात आले आहे.

Suez Canal | २५ भारतीयांनी ७ दिवस जहाजावरच थांबून एव्हर गिव्हनला बाहेर काढलं

इजिप्त : एव्हर गिव्हन हे जहाज 23 मार्चला सुएझ कालव्यात (Suez Canal) अडकले होते. त्याचा जल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे हे जहाज बाहेर काढण्यासाठी तातडीने मोहिम सुरु केली. जहाज कमी पाण्यामुळे तेथे अडकले होते. अखेर 7 दिवसांनी म्हणजेच 29 मार्चला पाण्याला भरती आल्यामुळे ते बाहेर काढण्यात आले आहे. 18 मीटर खोलीपर्यंत वाळू खोदून हे जहाज बाहेर काढण्यात आले. आता ते जहाज इजिप्त येथील ग्रेट बिटर या तलावात हलवण्यात आले आहे.

हे जहाज बाहेर काढण्यासाठी लोकांनी खूप कष्ट घेतले. या जहाजीवर असलेले 25 कर्मचारी हे भारतीय होते. त्यांनी 7 ही दिवस जहाजावर थांबून आप-आपल्या पद्धतीने जहाज बाहेर काढण्यास योगदान दिले. या कर्मचाऱ्यांचे बर्नहार्ड शल्ट शिपमेंट या कंपनीने कौतुक केले. या कंपनीकडे जहाजाच्या तांत्रिक व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.

fallbacks

एव्हर गिव्हन हे विशाल जहाज 400 मीटर लांबीचे आहे. या जहाजात 9.6 अब्ज डॅालरचा माल अडकून पडला होता. जागतिक वाहातुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुएझ कालव्यात हा जहाज आडवा अडकला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे कालव्याच्या दक्षिणेकडे सुमारे 300 मालवाहू जहाजांची मोठी रांग लागली होती. काही जहाजांनी पुढे जाण्यासाठी आफ्रिकेतील दक्षिण भागातून जाणरा लांब पल्ल्याचा आणि खर्चिक मार्ग निवडला.

आता हे जहाज कालव्यातून बाहेर काढल्यामुळे वाहातुक कोंडीचा प्रश्न सुटला आहे आणि आणखी हजारो डॅालर्सच नुकसान होण्यापासून थांबले आहे.

Read More