Marathi News> भारत
Advertisement

भारताला जगात तिसऱ्या क्रमांकांची आर्थिक महसत्ता बनवणार 'ही' 5 राज्य; महाराष्ट्र तर आहेच पण 'या' 2 राज्यांची नावे जाणून शॉक व्हाल

भारत जगात तिसऱ्या क्रमांकांची आर्थिक महसत्ता बनणार आहे. भारतातील 5 राज्य भारताला महासत्ता बनवणार आहे.   

 भारताला जगात तिसऱ्या क्रमांकांची आर्थिक महसत्ता बनवणार 'ही' 5 राज्य; महाराष्ट्र तर आहेच पण 'या' 2 राज्यांची नावे जाणून शॉक व्हाल

Morgan Stanley Report: भारताची अर्थव्यवस्था रॉकेटसारखी भरारी घेत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. आघाडीची गुंतवणूक कंपनी मॉर्गन स्टॅनलीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की 2028 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. 2035 पर्यंत भारताची  अर्थव्यवस्था 10.6 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. भारतातील 5 राज्य भारताला जगात तिसऱ्या क्रमांकांची आर्थिक महसत्ता बनवणार आहे. या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र तर आहेच पण 2 राज्यांची नावे जाणून शॉक व्हाल . 

2030 ते 2035 दरम्यान तीन ते पाच राज्यांची यात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अर्थव्यवस्था सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्स असेल. यांचा समावेश जागतिक स्तरावरील टॉप 20 अर्थव्यवस्थांमध्ये होईल. अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत ज्या राज्यांनी क्रमवारीत चांगली सुधारणा दर्शविली आहे त्यात छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे असले मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात म्हटले आहे. 

मॉर्गन स्टॅनलीच्या मते, येत्या दशकात जगाच्या एकूण जीडीपी वाढीमध्ये भारताचा वाटा 20 टक्के असेल. अशा परिस्थितीत, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा देश एक अतिशय महत्त्वाचा बाजार आहे. हे निकाल सुनिश्चित करण्यासाठी, इतर गोष्टींबरोबरच, भारताच्या 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. राज्ये केवळ वित्तीय व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत तर योग्य धोरणे बनवून आणि प्रोत्साहन देऊन व्यवसाय परिस्थिती सुलभ करतात. तसेच, ते गुंतवणुकीसाठी स्पर्धा करतात असे मॉर्गन स्टॅनलीचे अर्थशास्त्रज्ञ म्हणाले.

 

Read More