Marathi News> भारत
Advertisement

Independence Day 2022: आज देशाचा 75 वा, की 76 वा स्वातंत्र्य दिन? दूर करा तुमचं Confusion

आजचा दिवस मोठा आहे, तुम्ही ही चूक करु नका...   

Independence Day 2022: आज देशाचा 75 वा, की 76 वा स्वातंत्र्य दिन? दूर करा तुमचं Confusion

Independence Day of India: देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फक्त शासनदरबारीच नव्हे, तर प्रत्येक देशवासियाच्या मनात आज आनंदाची, समाधानाची भावना ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. विविध स्तरांवर समाजातील प्रत्येक वर्गाकडून देशाच्या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचा आनंद साजरा केला जात आहे. (Independence Day)

सोशल मीडिया म्हणू नका, पाट्या म्हणू नका किंवा रस्त्यांवरील चौक म्हणू नका. सर्वत्र शूरवीरांच्या बलिदानाला वंदन करत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होताना दिसत आहे. काही ठिकाणी देशाच्या (75 Independence Day) 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, तर काही ठिकाणी 76 वा स्वातंत्र्य दिन म्हणूनही उल्लेख केला जात आहे. 

तुमचाही गोंधळ होतोय का? 
(British Rule) ब्रिटीश राजवटीच्या तावडीतून भारतानं मोकळा श्वास घेतला तो म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी. म्हणजेच 15 ऑगस्ट 1948 ला देशाच्या स्वातंत्र दिवसाला एक वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्यावेळी स्वातंत्र्य दिनाचं दुसरं वर्ष असलं तरीही त्याची वर्षपूर्ती होती. 

पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन... पाहा LIVE

 

जेव्हा स्वातंत्र्य दिन अला उल्लेख केला जातो तेव्हा त्या मूळ दिवसाची तारीखही गणली जाते. अशाच प्रकारे 1957 ला देशाच्या स्वातंत्र्याची दशकपूर्ती साजरा करण्यात आली. पण, तो देशाचा 11 वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा झाला. 

अगदी त्याचप्रकारे 2022 मध्ये, म्हणजेच यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असली तरीही हा देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे तुम्ही कुठे 76 वा स्वातंत्र्य दिन असा उल्लेख पाहिला किंवा ऐकला तर तो चुकीचा आहे, असं समजू नका. 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Read More