Marathi News> भारत
Advertisement

भारतातील सर्वात मोठे बलात्कार प्रकरण; धर्मस्थळ मंदिर परिसरात गाडलेले 100 नग्न मृतदेह, महिलांवर बलात्कार आणि...

भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील पवित्र मंदिराबाहेर झालेल्या सामूहिक दफन घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 

भारतातील सर्वात मोठे बलात्कार प्रकरण; धर्मस्थळ मंदिर परिसरात गाडलेले 100 नग्न मृतदेह, महिलांवर बलात्कार आणि...

Dharmasthala Crime: भारतातील सर्वात मोठे बलात्कार आणि हत्यांकांड प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील  धर्मस्थळ मंदिर परिसरात 100 पेक्षा अधिक मृतदेह गाडले आले आहेत.  महिलांवर बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी स्वच्छता कर्मचाऱ्याच्या खळबळजनक खुलाशानंतर येथे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बांगलागुड्डे भागात विशेष तपास पथकाने (एसआयटी) सातव्या दिवशीही खोदकाम सुरू ठेवले. मंगळवारी, साइट क्रमांक 6 आणि 11-A मधून सांगाड्याचे अवशेष सापडले. आतापर्यंत, सुमारे 100 हाडांचे तुकडे सापडले आहेत. 

माजी स्वच्छता कर्मचाऱ्याच्या सांगण्यानुसार खोदकाम करण्यात आले. साइट क्रमांक 6 आणि 11-A मधून सांगाड्याचे अवशेष सापडले. आतापर्यंत, सुमारे 100 हाडांचे तुकडे सापडले आहेत. जरी साइट क्रमांक 11-A ही तक्रारदाराने आधी उल्लेख केलेली जागा नाही. पण ती त्याच्या जवळ आहे. 5 ऑगस्ट रोजी त्याच भागात शोध घेण्यात आला पण काहीही सापडले नाही. एसआयटी प्रत्येक ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक खोदकाम करत आहे.

प्रत्यक्षात मंगळवारी सकाळी कामगारांनी झुडपे काढून खोदकाम सुरू केले. खदोकामासाठी मशिनचा वापर करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी उत्खनन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. जेणेकरून जर काही अवशेष असतील तर ते पावसातही काढता येतील. पोलिसांचे श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. तपासात अडथळा येऊ नये म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि परिसर सील करण्यात आला आहे.

एसआयटीने म्हटले आहे की आतापर्यंत सापडलेले अवशेष कदाचित एखाद्या पुरूषाचे आहेत परंतु फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा अहवाल आल्यानंतरच याची पुष्टी करता येईल. उत्खननादरम्यान अनेक ठिकाणी फक्त माती आणि दगड सापडले. तर काही ठिकाणी मानवी अवशेष सापडले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 12 आणि 13 क्रमांकाच्या ठिकाणी अद्याप उत्खनन झालेले नाही. तथापि, सततच्या पावसामुळे तपासाची गती मंदावत आहे.

दुसरीकडे, केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यातील पल्लीपुरम भागात 68 वर्षीय पुरूष सेबॅस्टियन सीएमच्या घरात जळालेली हाडे, रक्ताचे डाग आणि महिलांच्या वैयक्तिक वस्तू सापडल्याने खळबळ उडाली.   हा हत्येचा प्रकार असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. जैनम्मा नावाच्या महिलेच्या हत्येप्रकरणी सेबॅस्टियनला आधीच अटक करण्यात आली आहे. आता 2006 पासून बेपत्ता झालेल्या बिंदू पद्मनाभन आणि 2012 मध्ये आयेशा या दोन अन्य महिलांच्या प्रकरणांचीही चौकशी सुरू आहे.

खरंतर, जैनम्माच्या पतीने बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्यावर ही चौकशी सुरू झाली. गुन्हे शाखेने मोबाईल लोकेशनच्या आधारे सेबॅस्टियनला अटक केली. त्याच्या अटकेनंतर, त्याच्या घराच्या उत्खननात सुमारे 20 जळालेल्या हाडांचे तुकडे, दात, रक्ताचे डाग, महिलेचे कपडे आणि पर्स सापडले. सर्व वस्तू फॉरेन्सिक डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. सेबॅस्टियनने एकट्या किंवा सामाजिकदृष्ट्या एकाकी असलेल्या महिलांना लक्ष्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

तपासात असेही समोर आले आहे की सेबॅस्टियनवर बनावट कागदपत्रांच्या मदतीने बिंदू पद्मनाभन यांची मालमत्ता विकल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत मिनी नावाची एक महिलाही सहभागी होती. सेबॅस्टियनला मालमत्ता हडप करण्याच्या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. 2018 मध्ये, या प्रकरणाशी संबंधित आणखी एका संशयिताचाही गूढ मृत्यू झाला. आता कार्यकर्ते आणि कृती परिषदा एसआयटीकडून या प्रकरणांची संयुक्त चौकशी करण्याची मागणी करत आहेत. आणखी खळबळजनक खुलासे अपेक्षित असल्याने परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण आहे.

FAQ

1. कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिर परिसरात नेमके काय घडले आहे?

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बांगलागुड्डे येथील धर्मस्थळ मंदिर परिसरात 100 हून अधिक मृतदेह दफन केल्याचा दावा माजी स्वच्छता कर्मचाऱ्याने केला आहे. त्याने 1998 ते 2014 या कालावधीत अनेक शव दफन करण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे, ज्यात प्रामुख्याने बलात्कार आणि हत्येच्या शिकार झालेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

2. या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांनी नेत्रावती नदीच्या स्नान घाटाजवळील साइट क्रमांक 6 आणि 11-A येथे उत्खनन केले आहे. पोलिसांचे श्वान पथक आणि मशिन्सचा वापर करून तपास सुरू आहे.

3. आतापर्यंत काय सापडले आहे?

साइट क्रमांक 6 आणि 11-A येथे सुमारे 100 हाडांचे तुकडे सापडले आहेत. काही अवशेष पुरुषांचे असण्याची शक्यता आहे, परंतु फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानंतरच याची पुष्टी होईल. काही ठिकाणी फक्त माती आणि दगड सापडले, तर काही ठिकाणी मानवी अवशेष मिळाले

 

Read More