Marathi News> भारत
Advertisement

व्हॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींसाठी Indigo ची धमाकेदार ऑफर; मिळणार एवढं डिस्काऊंट

जाणून घ्या ऑफरची सगळी माहिती 

व्हॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींसाठी Indigo ची धमाकेदार ऑफर; मिळणार एवढं डिस्काऊंट

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. अशातच इंडिगो या विमान कंपनीने लस घेतलेल्या व्यक्तीसाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे. विमान प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 

बुधवारी इंडिगो कंपनीने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक ऑफर जाहीर केली आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस जरी घेतला असेल तरीही प्रवाशाला 10 टक्के सूट मिळणार आहे. बुधवारपासून ही ऑफर जाहीर केली आहे. महत्वाचं म्हणजे ही सूट बेसिक शुल्कावर देण्यात आली आहे. ही सूट काही मर्यादीत जागांवर उपलब्ध आहे. 

काय आहे ही ऑफर?

18 किंवा याहून अधिक वयाच्या व्यक्तीकरता ही ऑफर देण्यात आली आहे. 
प्रवाशी तिकिटाच्या बेस शुल्कावर 10 टक्के सूट देण्यात आली आहे. 
ही सूट मर्यादित जागांवर उपलब्ध आहे. 
तिकिट बुकिंग करणारी व्यक्ती ही भारतात असणे आवश्यक आहे. 
महत्वाचं म्हणजे कोविड प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस तरी व्यक्तीने घेतलेला हवा. 

आरोग्य सेतुवरील प्रमाणपत्र दाखवून मिळवा ऑफर 

ज्या प्रवाशांना सूट मिळाली आहे. त्यांना विमानतळावर चेक इन करताना काऊंटरवर तसेच बोर्डिंग गेटवर देखील सेतू ऍपवरील रिपोर्ट दाखवावा लागेल. कोविड 19 च्या लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखणे आवश्यक आहे. 

देशात 88 दिवसांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 60 हजारांहून कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 53,256 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1422 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी 47,262 कोरोना रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली होती. काल दिवसभरात 78,190 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

Read More