Marathi News> भारत
Advertisement

...म्हणून इंडिगोच्या कर्मचाऱ्यानेच उडवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा

इंदिर गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या दिल्ली-मुंबई विमानात बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे. अफवा पसरवणाऱ्या इंडिगोच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय आरोपी कार्तिक महादेव भटने 2 मेला एका अनोळखी नंबरवरुन इंडिगो एयरलाईंसच्या कार्यालयात फोन करुन ही बॉम्बची माहिती दिली. कॉलमध्ये त्याने मुंबईसाठी उड़्डान भरणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विमानात चेकिंग केली गेली पण असंच काहीच आढळलं नाही.

...म्हणून इंडिगोच्या कर्मचाऱ्यानेच उडवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा

नवी दिल्ली : इंदिर गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या दिल्ली-मुंबई विमानात बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे. अफवा पसरवणाऱ्या इंडिगोच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय आरोपी कार्तिक महादेव भटने 2 मेला एका अनोळखी नंबरवरुन इंडिगो एयरलाईंसच्या कार्यालयात फोन करुन ही बॉम्बची माहिती दिली. कॉलमध्ये त्याने मुंबईसाठी उड़्डान भरणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विमानात चेकिंग केली गेली पण असंच काहीच आढळलं नाही.

पोलिसांनी विमानातून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि विमानात चेकींग केली. यानंतर पोलिसांनी ही एक अफवा असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी भट याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा मान्य केला.

भटने म्हटलं की, इंडिगोमध्ये त्याचं काम संतोषजनक नव्हतं. ते सुधारण्यासाठी त्याला नोटीस देण्य़ात आली होती. 3 महिन्यात त्याला काम सुधारण्याची नोटीस देण्यात आली होती. याला कंटाळून त्यान हा फोन केल्याचं त्याने म्हटलं आहे.

Read More