Influencer Tries To Prank 5-Star For Free Breakfast: 5 स्टार हॉटेलमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने मोफत नाश्ता करण्यासाठी प्रँक करण्याचा प्रयत्न केला. पण तो उलटा तिच्याच गळ्यात पडला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हॉटेल स्टाफच्या हातावर तुरी देखील या तरुणीने मोफत ब्रेकफास्ट एन्जॉय करण्याचा प्लान केला खरा पण तो तिलाच महागात पडला आहे. कारण हॉटेल मोठ्या रकमेचं बिल तरुणीला पाठवलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की. इन्फ्लुएन्सर हॉटेलच्या ब्रेकफास्ट बुफे खाण्यासाठी आज जाते. ती त्या हॉटेलमध्ये राहिल्याच भासवते. पण लवकरच हॉटेल स्टाफजवळ हा सगळा प्रकार उघडकीस येतो. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. तसेच मजेशीर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. काहीजण यावर कमेंट करतात की, मोफत जेवण्याचा अशस्वी प्रयत्न.
व्हायरल झालेल्या या प्रँकवर युझर्स कमेंट करत आहे. एका युझरने लिहिलं आहे की, मोफतचा ब्रेकफास्ट समजून गेली पण महागडं जेवणंच करुन आली. दुसऱ्या युझरने लिहिलं आहे की, 5 स्टार हॉटेल आहे. येथे जुगाड चालत नाही. काही युझर्सने इन्फ्लुएन्सरचं वागणं चुकीचं आणि लाजास्पद अशल्याचं म्हटलं आहे. यावरुन कळतं की, असं फुकटचं खाणं किती चुकीचं आहे.