Marathi News> भारत
Advertisement

Instagram Reel बनवताना तरुणीची फजिती, भन्नाट Video व्हायरल

Girl Instagram Reel: होय, इंस्टाग्राम रील्स बनवत असताना एक व्यक्ती त्या मुलीच्या मागे आला आणि...

Instagram Reel बनवताना तरुणीची फजिती, भन्नाट Video व्हायरल

Girl Dance Video: सोशल मीडियाने (Social media) सगळ्या जगाला वेड लावलं आहे असं म्हणं वावग ठरणार नाही. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियावर स्टोरी (Story) आणि रीलसाठी फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) तयार करताना दिसतात. या रीलद्वारे अनेक जण पैसेही कमवतात. प्रसिद्धीसाठी एक तरुणी जेव्हा व्हिडीओ बनवायला जाते तेव्हा तिचा हा व्हिडीओ वेगळ्याच कारणामुळे व्हायरल (Viral) होतो आहे. 

कोणाचं काय तर कोणाचं काय

आजकाल इंस्टाग्राम रील (Instagram Reel) बनवण्यासाठी लोक लोकप्रिय गाण्यांवर नाचणे सामान्य आहे. व्हायरल होण्यासाठी, रील बनवणारे ही तरुणाई कुठे डान्स आणि अभिनय करायला लागतात. सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'दिलबर'(Dilbar) या लोकप्रिय गाण्यावर एका महिलेचा डान्स करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर (Internet) व्हायरल झाला आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल होण्यामागे महिलेचे डान्स स्टेप्स नाही. (instagram reel Girl Dance  Video and trending video Viral on Social media nmp)

आणि त्यामुळे झाली तरुणीची फजिती

होय, इंस्टाग्राम रील्स बनवत असताना एक व्यक्ती त्या मुलीच्या मागे आला आणि व्हिडीओची वाट लावली. ट्विटरवर (Twitter) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी व्यस्त बाजाराच्या मध्यभागी नाचताना दिसत आहे. पण, थोड्याच वेळात विचित्र पण मजेशीर पद्धतीने मुलीच्या डान्स (Girl Dance) मूव्हची नक्कल करताना एक व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेईल. हा मजेशीर व्हिडिओ (Funny video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

हा व्हिडिओ जवळपास 3 लाख वेळा पाहिला गेला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतं आहे. हा व्हिडिओ @Chilled_Yogi नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे.

Read More