Marathi News> भारत
Advertisement

Escalators च्या दोन्ही बाजूला ब्रश का लावलेले असतात माहितेय का? चप्पल साफ करण्यासाठी नाही तर...

Reason Why Brushes On Escalators: मॉलमध्ये अनेकदा तुम्ही या फिरत्या जिन्यांवरील ब्रशने चप्पल साफ करण्याचा प्रयत्न केला असेल. पण हे ब्रश साफसफाईसाठी लावलेले नसतात हे तुम्हाला माहितीये का?

Escalators च्या दोन्ही बाजूला ब्रश का लावलेले असतात माहितेय का? चप्पल साफ करण्यासाठी नाही तर...

Reason Why Brushes On Escalators: एस्केलेटर म्हणजेच चालत्या जिन्याच्या बाजूला असलेल्या ब्रशने तुम्हीसुद्धा अनेकदा बूट किंवा चप्पल साफ करुन घेण्याचा प्रयत्न केला असेल. मात्र या जिन्यांच्या दोन्ही बाजूला असणारे ब्रश हे बूट किंवा चप्पल साफ करण्यासाठी नसतात असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे ब्रश असतात कशासाठी? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत आणि या ब्रशचा खरा वापर काय असतो हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

या ब्रशला म्हणतात तरी काय?

फिरत्या जिन्यांच्या दोन्ही बाजूला असलेले हे ब्रश बनवण्यासाठी नायलॉनचा वापर केला जातो. या ब्रशला तांत्रिक भाषेत 'सेफ्टी ब्रशेस' असं म्हणतात. काही देशांमध्ये एस्केलेटरवरील या ब्रशला स्कर्ट डिफ्लेक्टर्स म्हणजेच स्कर्टसारख्या गोष्टी दूर ढकलण्याचं काम करणारी गोष्ट म्हणून ओळखले जातात. आता या नावावरुन तुम्हाला या ब्रशचा मूळ उद्देश काय असतो हे लक्षात आलं असेलच. एस्केलेटरवरुन जाताना अनेकदा लोकांचे कपडे अथवा हातातील गोष्टी किंवा बुटाच्या लेस किंवा पायातील चप्पल दोन्ही बाजूंच्या कडांमध्ये अडकतात. हेच टाळण्याचं काम ब्रश करतात.

ब्रश लावण्याचं खरं कारण काय?

एस्केलेटरवरुन जाणाऱ्या व्यक्तींच्या पायातील चपला, बुटाच्या लेस, ड्रेस, पॅण्ट, गाऊनचा भाग, साडी किंवा बॅगांचे बंद यासारख्या गोष्टी अडकू नये म्हणून हे ब्रश लावलेले असतात. मात्र काही तज्ज्ञांनुसार, हे असे ब्रश पाहिल्यानंतर या फिरत्या जिन्यांवरुन जाणारे लोक आपोआपच या जिन्यांच्या दोन्ही बाजूंना अगदी टेकून उभं राहण्याऐवजी लांब उभे राहतात.

सायकोलॉजिकल कारण...

हे ब्रश आपल्या बुटांना किंवा कापड्यांना लागू नयेत या विचाराने ते जिन्याच्या अगदी बाजूला उभे राहत नाहीत. मात्र यामुळेही कपडे किंवा बुटांच्या लेस या जिन्यांमध्ये अडकू नये हा मूळ हेतू साध्य होतो. या फिरणाऱ्या जिन्यांच्या कडांमध्ये कपडे अथवा चप्पलेचा एखादा भाग अडकला तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 

अनेकांनी शेअर केले आपले अनुभव

टीकटॉकवरील 'अनटोल्ड फॅक्ट्स' या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, "एस्केलेटरवर होणाऱ्या अपघांपैकी सर्वात मोठं कारण हे यामध्ये कपडे अथवा चप्पल, बुटांचा एखादा भाग अडकणे हे आहे. सामान्यपणे फिरत्या जिन्यांवर उभं राहताना लोक एखाद्या बाजूला रेलून उभे राहतात आणि त्यांच्या अंगावरील किंवा हातातील गोष्टी या फिरत्या जिन्यांच्या कडांमध्ये अडकतात," असं म्हटलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर अशाप्रकारे खरोखरच आमचे कपडे एस्केलेटरमध्ये अडकल्याचा अनुभव सांगितला आहे. 

Read More