Marathi News> भारत
Advertisement

Intraday Tips | बाजारात पैसे लावून काही तासात बना लखपती; 5 महत्वाच्या टीप्स

शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी इंट्राडे ट्रेडिंग हा चांगला पर्याय आहे. जेथे एकाच दिवसात शेअरची खरेदी आणि विक्री करून भरपूर नफा कमावता येतो.

Intraday Tips | बाजारात पैसे लावून काही तासात बना लखपती; 5 महत्वाच्या टीप्स

मुंबई : शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांसाठी इंट्राडे ट्रेडिंग हा चांगला पर्याय आहे. जेथे एकाच दिवसात शेअरची खरेदी आणि विक्री करून भरपूर नफा कमावता येतो. यासाठी योग्य स्टॉकची निवड करणे गरजेचे ठरते. 

परंतु इंट्राडे ट्रेडिंगमध्ये रिस्क खूप असते. त्यासाठी शिस्तबद्ध ट्रेडिंग करणे गरजेचे असते. जाणून घ्या काही टीप्स

शेअर बाजाराच्या बाबतीत रहा अपडेट
बाजारात पैसे लावण्याआधी बाजारातील बातम्यांबाबत अपडेट रहा. त्यामुळे कोणत्या सेक्टरच्या बाबतीत काय सेंटीमेंट आहेत याचा अंदाज येतो.

हाय लिक्विडिटीवाले स्टॉक निवडा

शेअरची निवड करताना लक्षात ठेवा की, कशात किती लिक्विडिटी आहे. अशाप्रकारे इंट्राडेसाठी 2-3 शेअर तुम्ही निवडू शकता. ज्या शेअरमध्ये लिक्विडिटी कमी आहे. असे शेअर निवडू नका.

टार्गेट सेट करा
शेअर खरेदी करण्याआधी हे ठरवा की, तुम्हाला शेअर कोणत्या भावात खरेदी करायाचा आहे. आणि कोणत्या भावात विकायचा आहे. त्यामुळे टार्गेटवर शेअर पोहचताच लगेच बाजारातून नफा घेऊन बाहेर पडणे आवश्यक असते.

स्टॉपलॉस लावा
इंट्राडे ट्रेडिंगमध्ये स्टॉपलॉस  जरूर लावा, स्टॉपलॉस लावल्याने गुंतवणूकदार संभावित नुकसान कमी करू शकतात.

वॉलेटाइल स्टॉकपासून दूर रहा
गुंतवणूकदारांनी अती चढ-उतार करणाऱ्या शेअरपासून दूर रहायला हवे. शेअरची निवड करताना मार्केटचा ट्रेंड जरूर तपासा.

Read More