Marathi News> भारत
Advertisement

'इराणने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, युद्धानंतर इराण मुस्लिम जगाचा...", भारतातील माजी मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Iran Israel War: इराण आणि इस्रायलदरम्यान मागील 12 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष काही प्रमाणात शांत झाला असून दोन्ही देशांनी युद्धविराम स्वीकारल्यानंतर आता भारतामधील एका नेत्याने अमेरिकेवर तोफ डागलीये.

'इराणने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, युद्धानंतर इराण मुस्लिम जगाचा...

Iran-Israel War: जवळपास दोन आठवड्यांपासून सुरु असलेला इस्रायल आणि इराणमधील वाद सध्या संपुष्टात आला आहे. 12 दिवसांपासून सुरु असलेल्या वादानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. या युद्धामध्ये इस्रायलच्या बाजूने महासत्ता असलेली अमेरिका उभी असतानाही इराणने कमालीची आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. आता इराणच्या या आक्रमक भूमिकेबद्दल जगभरात चर्चा होत आहे. असं असतानाच एका भारतीय नेत्याने इराणवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या युद्धाच्या माध्यमातून इराण हा मुस्लिम देशांचा नवा 'नेता' म्हणून समोर आल्याचं या भारतीय नेत्याने म्हटलं आहे. 

नेमकं कोणी आणि काय म्हटलंय?

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पिपल्स डेमॉक्रेटिक पार्टी'च्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी इस्रायविरुद्धच्या संघर्षात घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचं कौतुक केलं आहे. या संघर्षामधून इराण हा मुस्लिम जगतामधील नवं नेतृत्व आणि नवीन नेता म्हणून समोर आला असल्याचंही मुफ्ती यांनी नमूद केलं आहे. "सुमारे 12 दिवस चाललेल्या या संघर्षामधून इराणाने अमेरिका आणि इस्रायला चांगला धडा शिकवता आहे. ही जगभरातील अभिमानाची बाब आहे," अशा शब्दात महबूबा मुफ्ती यांनी इराणचं कौतुक केलं आहे. "अमेरिकेसारख्या महाशक्तीसोबत लढण्यासाठी मी इराणमधील जनता, तिथलं लष्कर आणि नेतृत्वाला सलाम करते. इराणकडे फारमोठा शस्त्रसाठा, अणुबॉम्ब असं काही नव्हतं. तरी त्यांनी या युद्धात अमेरिका आणि इस्रायला धूळ चारली," असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

इराणाने अमेरिकेला असा धडा शिकवलाय की जो...

"अखेरीस युद्धविरामाची मागणी इराणकडून करण्यात आली नाही. या युद्धामुळे इराणची किंमत वाढली आहे. तसेच मुस्लिम जगतामध्ये इराण हा जागतिक नेतृत्व म्हणून समोर आला आहे," अशा शब्दात महबूबा मुफ्ती यांनी इराणचं कौतुक केलं आहे. "इराणने अमेरिकेला असा धडा शिकवला आहे की जो दीर्घकाळापर्यंत तक्षात ठेवता जाईल. हा संघर्ष थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना कतारची मदत घ्यावी लागली," असा उल्लेखही मुफ्ती यांनी इस्रायलचं कौतुक करताना केला आहे.

या गोष्टीची खंतही व्यक्त केली

"इस्रायल युद्धविरामारासाठी तयार आहे, आत्ता तुम्ही इराणला युद्धविरामासाठी तयार करा, असं अमेरिकेला सांगावं लागलं. एक मुस्लिम म्हणून आणि संपूर्ण जगभरातील मुस्लिमांसाठी ही आनंदाची बाब आहे. मात्र दुर्देवाने कुठल्याही मुस्लिम देशाने या संघर्षात इराणला मदत केली नाही," असं म्हणत महबूबा मुफ्ती यांनी नाराजीही व्यक्त केली.

Read More