IRCTC New Rule: जर तुम्ही ट्रेनचे तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता आयआरसीटीसीने तात्काळ तिकीट बुकिंगबाबत मोठे बदल केले आहेत. ज्याचा परिणाम लाखो प्रवाशांच्या प्लानिंगवर परिणाम होऊ शकतो. नवा नियम 15 जुलैपासून हा नियम लागू झाला आहे. या अंतर्गंत तात्काळ तिकीट बुकिंगच्या आधी 30 मिनिटांत एक महत्त्वाचे काम तुम्ही करू शकणार नाहीत.
रेल्वेच्या या नियम बदलाचा उद्देश तिकीटांचा काळाबाजर आणि दलालांकडून होणारे गैरव्यवहार रोखणे हा आहे. तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होताच काही मिनिटांतच सगळे तिकीट बुक होात आणि सामान्य नागरिकांना तिकीट मिळत नाहीत. त्यामुळं रेल्वेने हा हे पाऊल उचलले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार, आता तात्काळ तिकीट बुकिंगच्या पहिल्या 30 मिनिटांचा कालावधीत रजिस्टर एजंट आणि थर्ड पार्टी तिकीट बुकिग करणाऱ्यांसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सकाळी 10.00 ते 10.30 वाजेपर्यंत एसी क्लास बुकिंगसाठी
नॉन-एसी क्लासेसच्या बुकिंगसाठी, सकाळी11 ते 11.30
या 30 मिनिटांच्या दरम्यान कोणतेही अनरजिस्टर एजेंट बुकिंग करु शकणार नाहीत. हा वेळ फक्त सामान्य प्रवाशांसाठी असून सामान्य प्रवाशीच तिकीट बुक करू शकणार आहात.
त्याचबरोबर आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे, तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठीही ओटीपी व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. म्हणजेच प्रवाशी तिकीट बुक तेव्हाच करू शकता जेव्हा आयआरसीटीसी प्रोफाइल आधार कार्डशी जोडलेले असायला हवे आणि मोबाईलवर आलेल्या ओटीपीची पुष्टी होणे गरजेचे आहे.
जम्मू विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, उचित सिंघल म्हणाले की, आता ओटीपी पडताळणीशिवाय तत्काळ तिकीट बुकिंग शक्य होणार नाही. प्रवाशांना त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला आहे आणि आयआरसीटीसी प्रोफाइलमध्ये अपडेट केलेला आहे याची खात्री करावी लागेल.
पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. प्रवाशांना त्यांचे आयआरसीटीसी खाते शक्य तितक्या लवकर आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून शेवटच्या क्षणी कोणताही त्रास होणार नाही.