Marathi News> भारत
Advertisement

वेटिंग तिकीटांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, रिझर्व्हेशन चार्टमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता; आता 8 तास आधीच...

IRCTC Rules Change From 1 July: ट्रेनच्या रिझर्व्हेशन चार्टमध्ये मोठे बदल, आता चार नव्हे तर आठ तास आधी रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट तयार होणार आहे. 

वेटिंग तिकीटांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, रिझर्व्हेशन चार्टमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता; आता 8 तास आधीच...

IRCTC Rules Change From 1 July:  भारतीय रेल्वेने प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहे. यापूर्वी ट्रेन सुटण्यासाठी 4 तासाआधी बनवण्यात येणारा रिझर्व्हेशन चार्ट आता 8 तास आधीच तयार करण्यात येणार आहे. जे प्रवाशी लांब पल्ल्यांचा प्रवास करतात त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. अनेकदा या प्रवाशांनी उशिराने तिकीट कन्फर्म झालंय की नाही याची माहिती मिळते. या निर्णयामुळं प्रवाशांना 8 तास आधीच त्यांच्या सीटची माहिती मिळणार आहेत. या बदलावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तिकीट प्रणाली अधिक स्मार्ट, पारदर्शी आणि सुलभ होईल, असं म्हटलं आहे. याचा अर्थ आता प्रवाशांना तिकिट बुक करणे सोप्पे होणार आहे. 

रेल्वेने चार्टिंग सिस्टममध्ये झालेल्या बदलांबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. रिझर्व्हेशन चार्ट तुम्ही तुमच्या फोनवरदेखील आरामात पाहू शकता. त्यासाठी तुमच्याकडे IRCTC चे अकाउंट असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही  IRCTCच्या वेबसाइट किंवा अॅपच्या मदतीने आरामात चार्ट तुमच्या फोनमध्येच पाहू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला स्थानकात चार्ट शोधण्याची गरज भासणार नाही. या चार्टमध्ये तुम्हाला माहिती मिळेल की कोणत्या कोचमध्ये कोणती सीट आरक्षित आहेत आणि कोणत्या सीट रिकाम्या आहेत. याच्या मदतीने प्रवासी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू शकणार आहेत. हा चार्ट फोनमध्ये कसा पाहू शकणार, हे जाणून घ्या. 

फोनमध्ये कसे चेक कराल

सगळ्यातपहिले  IRCTC चे अॅप किंवा वेबसाइट सुरू करा 

त्यानंतर ट्रेन किंवा तिकीट सेक्शनमध्ये जाऊन चार्ट/व्हॅकेन्सी किंवा रिझर्व्हेशन चार्टचा पर्याय निवडा

त्यानंतर ट्रेनचा नंबर, बोर्डिंग स्टेशन आणि प्रवासाची तारीख टाका

सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला चार्टमध्ये किती सीट उपलब्ध आहेत, याची माहिती मिळेल. 

जर तुम्ही एखादा विशिष्ट कोच किंवा सीटची माहिती मिळवू इच्छित असाल तर तसा पर्याय निवडा. 

1 जुलैपासून रेल्वे करणार बदल

रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेकडून बदल करण्यात येत आहेत. 1 जुलै 2025पासून हे बदल होणार आहेत. यातील एक रेल्वेकडून तात्काळ तिकीटांच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गंत आता 1 जुलैपासून आधार व्हेरिफाइड युजर्सही आयआरसीटीसी वेबसाइटव किंवा अॅपवर तत्काळ तिकीट बुक करू शकणार आहेत. या बदलाबरोबर, रेल्वे 1 जुलैपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करू शकतात. नॉनएसी मेल, एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटात 1 पैसे प्रति किमी आहेत. तर एसी क्लासमध्ये 2 प्रति किमी वाढ करण्यात येऊ शकते. 500 किमीपर्यंतच्या प्रवासासाठीच ही दरवाढ असणार आहे. 

Read More