Marathi News> भारत
Advertisement

सलग 3 दिवस बँका बंद, मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँक हॉलिडेची यादी

देशभरात जानेवारी महिन्यात बँका तब्बल 16 दिवसांसाठी बंद असणार आहेत. वेगवेगळ्या सणांच्या कारणास्तव या बँका बंद असतील.   

सलग 3 दिवस बँका बंद, मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँक हॉलिडेची यादी

देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका एकूण 16 दिवस बंद असणार आहेत. 

जानेवारी 2024 मध्ये बँका 16 दिवसांसाठी बंद असणार आहेत. यामध्ये रविवार आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसंच उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू या प्रादेशिक सणांना लक्षात घेऊन सोमवारी 15 जानेवारी रोजी अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहूच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम आणि आसाममध्ये 15 जानेवारी रोजी बँका बंद राहतील. याचा अर्थ बँका सलग 3 दिवस बंद राहणार आहेत. 13 जानेवारीला महिन्यातील दुसरा शनिवार आहे, रविवारी बँक बंद असते आणि सोमवारी 15 जानेवारीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांचं कामकाज बंद असेल. 

दरम्यान केंद्र सरकारची सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. ही यादी केंद्र सरकारच्या सुट्ट्यांच्या यादीवर आधारित आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असल्याने सर्व राज्यातील बँका बंद असणार आहेत. 

जानेवारी 2024 मधील सर्व बँक हॉलिडेंची यादी

16 जानेवारी (मंगळवार) - बँका तामिळनाडू बंद (थिरुवल्लुवर दिवस)

17 जानेवारी (बुधवार)- चंदीगड आणि तामिळनाडूमध्ये बँका बंद (उझावर थिरुनल/श्री गुरु गोविंद सिंगजी जयंती)

22 जानेवारी (सोमवार) - मणिपूरमध्ये बँका बंद आहेत (Imoinu Iratpa)

23 जानेवारी (मंगळवार)- मणिपूरमध्ये बँका बंद 

25 जानेवारी (गुरुवार)- तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद (थाई पूसम/मो. हजरत अली यांचा वाढदिवस)

26 जानेवारी (शुक्रवार)- देशभरातील बँका बंद; त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगालमध्ये बँका सुरु

दरम्यान केंद्र सरकारच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 25 डिसेंबर ख्रिस्मसला सुट्टी असते. काही बँका 1 जानेवारीला नववर्षाच्या निमित्तानेही बंद असतात.

Read More