Marathi News> भारत
Advertisement

इशा अंबानीच्या लग्नासाठी अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये

 अंबानी कुटुंबाकडून विवाह सोहळा एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय.

इशा अंबानीच्या लग्नासाठी अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये

मुंबई : ​ भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनुष्का-विराट, दीपिका रणवीर यांच्या लग्नांच्या चर्चा झाल्यानंतर आता इशा अंबानीचं होणार लग्न चर्चेत आहे. ती आणि तिचा परिवार लग्नात कोणते कपडे घालणार इथंपासून ते कुठे?, कधी?, कसं? लग्न करणार याबाबत गप्पा रंगल्या आहेत. लग्नाआधीच्या कार्यक्रमांसाठी अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये दाखल झालंय.

या ऐतिहासिक शहराप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी अंबानी कुटुंबाकडून विवाह सोहळा एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय.

‘अन्न सेवा’

fallbacks

अंबानी कुटुंबाकडून 5 हजार 100 लोकांच्या जेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकांसाठी तिनही वेळा जेवण्याची सोय असणार आहे. ७ ते १० डिसेंबरपर्यंत अंबानी कुटुंबाकडून ही ‘अन्न सेवा’ सुरु राहणार आहे. १२ डिसेंबरला इशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत.

fallbacks

मात्र त्याआधी दोन्ही कुटुंब सेलिब्रेशन करण्यासाठी उदयपूरमध्ये दाखल झाली आहेत. ‘अन्न सेवा’हा त्याचाच एक भाग आहे. 

Read More