Marathi News> भारत
Advertisement

लग्नानंतर ईशा अंबानी राहणार एवढ्या महागड्या घरात

 लग्नानंतर ही नवी जोडी मुंबईच्या प्रसिध्द .....

लग्नानंतर ईशा अंबानी राहणार एवढ्या महागड्या घरात

मुंबई : इटलीच्या लेक कोमोच्या किनाऱ्यावर साखरपुडा केल्यानंतर आता ईशा मुकेश अंबानी पुढच्या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच 12 डिसेंबर रोजी मुंबईत लग्न होणार आहे. अशी चर्चा आहे की, लग्नानंतर ईशा आणि आनंद मुंबईच्या एका आलीशान सी - फेसिंग बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. लग्नानंतर ही नवी जोडी मुंबईच्या प्रसिध्द गुलाटी बिल्डींगमध्ये राहणार आहेत. 

450 करोड रुपयांत विकत घेतली गुलाटी बिल्डींग 

या दोघांचा विवाहसोहळा मुंबईत संपन्न होणार आहे. अंबानी आणि पीरामल कुटुंब लग्नाच्या अगोदर प्रीवेडिंग उदयपुरमध्ये करणार आहेत. स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा समावेश असावा म्हणून एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळीत असलेल्या या बिल्डिंगची निलामी 2012 मध्ये झाली. पीरामल यांनी 450 करोड रुपयांत खरेदी केली. अजय आणि स्वाती पीरामल हे या नव्या जोडप्याला ही बिल्डिंग गिफ्ट म्हणून देणार आहे. 

काय आहे गुलाटी इमारतीचं वेगळेपण 

मुंबईतील वरळी सारख्या परिसरात ही इमारत 50,000 स्वेअर फूटवर पसरली आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक लॉन असून मल्टीपरपज खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यांवर डायनिंग हॉल, बेडरूम, सर्कुलर स्टडी आणि इतर खोल्या आहे. इथे कामगारांसाठी घरं देखील आहे. 

1 डिसेंबर महिन्यात या घरात एक पूजा होणार आहे. लग्नानंतर या घरात ईशा आणि आनंद शिफ्ट होणार आहेत. आता या घरात इंटिरिअरचं काम सुरू असून या घरातून अरबी समुद्र दिसतो. 

Read More