Marathi News> भारत
Advertisement

अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील 'त्या' पुराव्यानं सारं जग थक्क

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रावर पठवलेल्या Chandrayaan 3 संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती समोर. लँडींगच्या दीड वर्षांनंतर...   

अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील 'त्या' पुराव्यानं सारं जग थक्क

ISRO Chandrayaan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडींग करत त्यानंतर पुढील निरीक्षणपर अहवालांसाठी योगदान देणाऱ्या ISRO च्या चांद्रयान 3 संदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. चांद्रयान 3 च्या माहितीपर अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्राबाबत काही असे पुरावे समोर आले आहेत जे पाहून सारं जग थक्क झालं आहे. 

इस्रोच्या या निरीक्षणानुसार चंद्राच्या ध्रुवीय भागांमध्ये आधिच्या तुलनेत सध्या अधिकाधिक बर्फाचे साठे दिसू शकतात. अहमदाबादचे संशोधक दुर्गा प्रसाद करनम यांच्या माहितीनुसार चंद्रावरील तापमानात झालेल्या मोठ्या बदलांमुळे बर्यप तयार होण्याची ही प्रक्रिया प्रभावित झालेली असू शकते. या हिमकणांचं निरीक्षण आणि अभ्यास केल्यास त्यांची निर्मिती नेमकी कशी झाली आणि हे हिमकण इथं नेमके कुठून आले यासंदर्भातील माहिती मिळण्यास मदत  होईल. 'कम्युनिकेशंस अर्थ एंड एनवायरनमेंट' नावाच्या नियतकालिकातून हा निरीक्षणपर अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. 

चंद्राचं तापमान... 

ऑगस्ट 2023 मध्ये चांद्रयान 3 नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. जिथं हे यान उतरलं तिथं 'शिव शक्ति पॉइंट' असं नावही देण्यात आलं, हे ठिकाण चंद्रावर 69 अंश दक्षिण अक्षांशावर असल्याचं सांगण्यात येतं. इथं दिवसा तापमान 82 अंश आणि रात्रीच्या वेळी तापमान उणे 170 अंश असल्याचं म्हटलं जातं. 

हेसुद्धा वाचा : जुन्या- धोकादायक इमारतींसंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंनी नागरिकांना दिला शब्द; पुनर्विकासाबाबत स्पष्टच बोलले... 

चांद्रयानाच्या विक्रम लँडरला 'ChaSTE' नावाचं एक खास उपकरण जोडण्यात आलं होतं, ज्याच्या माध्यमातून 10 सेंटीमीटर खालचं तापमान मोजण्यात आलं. इस्रोच्या माहितीनुसार ChaSTE च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठावरील मातीचं तापमान मोजण्यात आलं. करनम यांच्या माहितीनुसार लँडिंगच्या ठिकाणी हलका उतार असल्यामुळं ChaSTE नं घेतलेला तापमानाचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं. उताराचे कोन तापमानावर कसा प्रभाव पाडतात हे तिथं दाखवण्यात आलं. या मॉडेलमधून एक माहिती लक्षात येते की जर कोणताही उतार 14 अंश किंवा त्याहून अधिक प्रमाणात सूर्याच्या दिशेनं झुकलेला असेल तर तिथं बर्फ साचण्याची आणि तो तिथेच टिकून राहण्याची अधिक शक्यता असते. याचाच सरळ अर्थ असा की, चंद्राच्या पृष्ठावरील काही भागांमध्ये बर्फ तयार होऊन तिथं तो सहजगत्या आढळू शकतो. 

Read More