Marathi News> भारत
Advertisement

महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम सुरु असताना ISRO ने इतिहास रचला! बाहुबली रॉकेटने लाँच केले सर्वात मोठे Proba-3 Mission


Proba-3 Mission : ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने  Proba-3 Mission लाँच केले आहे. या मोहिमेमुळे सूर्याची अनेक रहस्य उलगडणार आहेत.   

महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम सुरु असताना ISRO ने इतिहास रचला! बाहुबली रॉकेटने लाँच केले सर्वात मोठे Proba-3 Mission

ISRO PSLV-C59 / Proba-3 Mission:   महाराष्ट्रात महायुती सरकारतचा भव्यदिव्य शपथ विधी सोहळा सुरु असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात   ISRO ने मोठी झेप घेतली आहे. ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने  Proba-3 Mission लाँच केले आहे. या मोहिमेमुळे सूर्याची अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

हे देखील वाचा... विमानातून फिरताना 100 फूट बर्फाखाली सापडले 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर; भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत  

4 डिसेंबर 2024  प्रोबा-3 सॅटेलाईट अवकाशात झेपावणार होते. मात्र, याचे  प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले.  ISRO ने आज म्हणजेच 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:04 वाजता प्रोबा-3 सॅटेलाईट प्रक्षेपित केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या एक नंबरच्या लाँचिंग पॅड वरून PSLV-XL या सर्वात शक्तीशाली रॉकेटद्वारे या सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले. अवकाश झेपावल्यानंतर अवघ्या 26 मिनिटांत  इस्रोचे रॉकेटने उपग्रहांना ठराविक कक्षेत पोहचवले.  ESA उपग्रह अवकाशात लाँच करुन ISRO ने जगाला आपली ताकद दाखवली आहे. 

सूर्याची रहस्य उलगडणार Proba-3 Mission

प्रामुख्याने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी  Proba-3 Mission लाँच करण्यात आले.सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात  प्रोबा-3 मिशन हाती घेण्यात आले आहे. कोरोना हे सूर्याचे बाह्य वातावरण आहे. हा भाग सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त गरम असतो. हे अंतराळ हवामानाचे स्त्रोत देखील आहे.  प्रोबा-3 मिशनमध्ये दोन उपग्रह आहेत. एकाचे नाव कोरोनाग्राफ आहे. याचे वजन 310 किलो आहे. तर, दुसऱ्याचे नाव ऑकल्टर असे आहे. याचे वजन 240 किलो इतके आहे. हे दोन्ही उपग्रह मिळून एक अनोखा प्रयोग करणार आहेत. ऑकल्ट उपग्रह सूर्याच्या डिस्कला कव्हर करणार आहे. यामुळे कोरोनाग्राफ उपग्रह सूर्याच्या कोरोनाचे स्पष्टपणे निरीक्षण करून याचा डेटा गोळा करणार आहे. या तंत्रज्ञानामुळे सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यात मदत होणार आहे. दोन्ही उपग्रह एकमेकांच्या वर, एका निश्चित कक्षेत एकत्र ठेवलेले आहेत. या तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रात्यक्षिक झाल्यास भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी नवीन मार्ग पर्याय उपलब्ध होणार आहेत. 

Read More