Marathi News> भारत
Advertisement

Aditya-L1 Mission: आणखी एक पाऊल टाकताच पृथ्वीपासून दुरावणार आदित्य एल1; मोहिमेबाबतची मोठी Update

Aditya-L1 Mission: तिथं (Chandrayaan 3) चांद्रयान मोहिमेतून इस्रोच्या हाती चंद्रासंदर्भातील नवनवी माहिती येत असतानाच भारतीय अंतरळ संशोधन संस्थेच्या सूर्य मोहिमेतही महत्त्वाचा टप्पा आल्याचटं स्पष्ट झालं आहे.     

Aditya-L1 Mission: आणखी एक पाऊल टाकताच पृथ्वीपासून दुरावणार आदित्य एल1; मोहिमेबाबतची मोठी Update

Aditya-L1 Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चांद्रयान 3 मोहिमेमागोमागच सूर्य मोहिमेवर काम करण्यास सुरुवात केली आणि आदित्य एल1 अवकाशात झेपावलं. इस्रोची ही सूर्यझेप संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा विषय ठरली असून, आता या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा अतिशय जवळ आला आहे. इस्रोनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार Aditya-L1 नं पृथ्वीच्या बाह्यकक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी मध्यरात्र उलटल्यानंतर चौथा अर्थ- बाऊंड मॅन्युवर यशस्वीरित्या पार पडलं. ज्यानंतर Aditya-L1 नं 256 km x 121973 ची कक्षा गाठली. 

महत्त्वाची बाब म्हणजे या टप्प्यानंतर आणखी एक मॅन्युवर प्रक्रिया पार पडेल. हा मोठा टप्पा असणार आहे कारण, या एका पावलानंतर आदित्य एल1 पृथ्वीपासून दुरावणार आहे. 

ट्रांस-लाग्रांजियन पॉइंट 1 इंसर्शन (TL1I) ची ही प्रक्रिया 19 सप्टेंबरला रात्री 2 वाजता पूर्ण होईल. ज्यानंतर आदित्य एल1 चा एल1 पर्यंतचा प्रवास सुरु होईल. तत्पूर्वी नुकत्याच पार पडलेल्या मॅन्युवर प्रक्रियेत नेमकं काय घडलं हे समजून घ्या... 

चौथ्या अर्थ-बाउंड मॅन्युवर दरम्यान आदित्य एल1 ला मॉरिशस, बंगळुरू, SDSC-SHAR आणि पोर्ट ब्लेअर येथे असणाऱ्या इस्रोच्या ग्राऊंड स्टेशनवरून ट्रॅक करण्यात आलं. इस्रोच्या माहितीनुसार आदित्य एल1 साठी फिजी द्वीप समूहामध्ये एक ट्रांन्सपोर्टेबल टर्मिनलही सज्ज असून, त्यामुळं आदित्य एल1 च्या बर्न ऑपरेशनला आधार मिळताना दिसत आहे. 

About the Author

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'म... Read more

Read More