Marathi News> भारत
Advertisement

Pahalgam: ...म्हणून मी अंत्यसंस्काराला आलो; एकमेव मयत मुस्लीम तरुणाच्या वडिलांचं CM कडून सांत्वन

Omar Abdullah Attends Funeral of Muslim Killed in Pahalgam Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये एका मुस्लीम व्यक्तीचाही समावेश आहे.

Pahalgam: ...म्हणून मी अंत्यसंस्काराला आलो; एकमेव मयत मुस्लीम तरुणाच्या वडिलांचं CM कडून सांत्वन

Omar Abdullah Attends Funeral of Muslim Killed in Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांनी बुधवारी सय्यद अदिल हुसैन शाह या व्यक्तीच्या अंत्यस्काराला हजेरी लावली. पहलगामच्या बैसरन येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सय्यद अदिल हुसैन शाह नावाच्या स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांमध्ये अदिल हा एकमेव मुस्लीम व्यक्ती आहे. अदिलच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्यामागील कारण काय आहे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मृत्यू झालेली एकमेव काश्मिरी मुस्लीम व्यक्ती

मंगळवारच्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये अदिल हा एकमेव काश्मिरी मुस्लीम व्यक्ती आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार सुरु केल्यानंतर या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न दिलने केला. दहशतवाद्यांकडून बंदूक खेचण्याचा प्रयत्न अदिलने केला. त्यावेळेस दहशतवाद्यांनी अदिलला गोळ्या घातल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अदिलचा मृत्यू झाला. अदिलवर बुधवारी अत्यंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना, "अदिलने दिलेलं बलिदान वाया जाणार नाही. अदिल हा फार शूर होता असं स्थानिक सांगतात. अदिलच्या कुटुंबाची काळजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतली जाईल" असं आश्वासन दिलं.

मुख्यमंत्री अदिलबद्दल नेमकं काय म्हणाले?

"हा तरुण पैसे कमवण्यासाठी फार कष्ट करायचा. त्याने मंगळवारी नेहमीप्रमाणे गामावर गेला. मात्र त्या दिवशी दुर्देवाने त्याचं पार्थिव घरी आलं. मात्र त्याने दिलेली प्राणांची आहुती व्यर्थ जाणार नाही. तो फार शूर होता आणि त्याने दहशतवाद्यांशी लढा देण्याचा प्रयत्न केला. त्याने हल्ला रोखण्यासाठी बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला असता त्याला लक्ष्य करण्यात आलं. आपल्या सर्वांनाच आता त्याच्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागणार आहे. सरकार अदिलच्या कुटुंबासोबत आहे, हेच अधोरेखित करण्यासाठी मी या अत्यंस्काराला उपस्थित आहे. आम्हाला त्याच्या कुटुंबासाठी जे काही करता येईल ते आम्ही करु," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.

अदिलचे वडील काय म्हणाले?

अदिलच्या वडिलांनी या हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना सोडू नका अशी विनंती मुख्यमंत्र्‍यांकडे केली. हल्लेखोरांना संपवून मृतांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, असंही अदिलचे वडील म्हणाले.

Read More