नवी दिल्ली : Jahangirpuri Violence : Babita Phogat tweet controversy : हिंदू समाज कधीही हिंसाचार करत नाही, असे ट्विट भाजप कार्यकर्ती आणि सुवर्णपदक विजेती बबिता फोगाट हिने केले. मात्र, हेच ट्विट वादाचे कारण ठरले आहे. कारण देशाची राजधानी दिल्लीत जहांगीरपुरा परिसरात हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) झालेल्या हिंसाचाराची (Delhi Jahangirpuri Violence) सध्या चर्चा आहे. असे असताना हिंचाराबाबत बबिताने ट्विट केल्याने वादाचे कारण ठरलंय.
दरम्यान, दिल्लीतील जहांगीरपुरा हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. यावरुन राजकारणही सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठे विधान केले आहे. तर बबिता फोगाटनेही वादग्रस्त ट्विट केल्याने नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
दिल्ली हिंसाचार प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचारानंतर लगेचच अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली. अमित शाह यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नये, असे आदेश देताना स्पष्ट केले. प्रशासनाकडून अतिक्रमणच्या नावाखाली बुलडोझर फिरविण्यात येत आहे. मात्र, या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, बबित फोगाटने दिल्ली हिंसाचारप्रकरणी ट्विट केल्याने नव्याने वादाचे कारण ठरले आहे.
हिन्दू समाज कभी भी दंगे नही करता है।
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 19, 2022
दंगे करने वाले समाज का नाम और समाज की पहचान सभी को है।
तब उमर खालिद, शरजील इमाम, ताहिर हुसैन और
अब अंसार, सलीम, इमाम शेख़, दिलशाद, अहीद
असलम…#DelhiRiots #KejriwalHatesHindus #जहांगीरपुरी_दिल्ली
दिल्ली हिंसाचारप्रकरणातील आरोपी अन्सार यास हरियाणातील भाजपने आम आदमी पक्षाचा नेता असल्याचे म्हटले. तर, पलटवार करताना आपने त्यास भाजप नेता असल्याचे सांगितले. हरियाणाच्या क्रीडा विभागाच्या सहसंचालक आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने दिल्ली हिंसाचारप्रकरणी विशिष्ट समाजाला टार्गेट केले. आम आदमी पक्षानेच दिल्लीत हनुमान जयंतीला दंगल घडवल्याचा आरोप बबिताने केला आहे. आप ही हिंसा करणारी पार्टी आहे, शाहीन बाग दंगलीमुळे ही बाब स्पष्ट झाली आहे. तर, जहांगीरपुरा येथील दंगलीचा तपास पूर्ण झाल्यानंतरही हे समोर येईल, असे बबिताने म्हटले आहे.